ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र

नगर शहरात तरुणाची 69 लाखांची फसवणूक.. पाच जणांविरूध्द तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

अहिल्यानगर

लिओ हॉलीडेज या कंपनीमध्ये गुंतवणूक केल्यास जास्त व्याजदर देण्याचे आमिष दाखवून तरूणाची 69 लाख 60 हजार रुपयांची फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे.

सावेडी उपनगरातील प्रोफेसर कॉलनी चौक येथे राहत असलेल्या तरुणाने या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

दिलेल्या फिर्यादीवरून अजयकुमार बाळासाहेब जगताप, त्याचे वडिल बाळासाहेब गंगाधर जगताप, आई जयश्री बाळासाहेब जगताप (रा. भिस्तबाग, सावेडी, अहिल्यानगर), बहिण तेजश्री गणेश गायकवाड व गणेश बबन गायकवाड (रा. पुणे) यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अशाच प्रकारची फसवणुक केल्याप्रकरणी अजयकुमार जगताप व इतरांविरूध्द यापूर्वी तोफखाना व कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहेत. यात आणखी एका गुन्ह्याची भर पडली आहे.

25 जुलै 2022 पासून ते 22 एप्रिल 2023 पर्यंत वेळोवेळी अजयकुमार जगताप व इतरांनी त्यांच्या लिओ हॉलिडेज या कंपनीमध्ये फिर्यादी यांनी पैसे गुंतवावे म्हणून त्यांना जास्त व्याजदर देण्याचे आमिष दाखविले. त्यांचा विश्वास संपादन करून 36 लाख रुपयांची गुंतवणूक करून घेतली. त्यांचे व्याज 34 लाख 20 हजार रुपये असे एकूण 70 लाख 20 हजार रुपये देणार असे आमिष दाखविले.

दरम्यान, जगताप व इतरांनी पैसे घेतल्यापासून फिर्यादी यांना फक्त 60 हजार रुपये परत केले. त्यांची मुद्दल व व्याजासह होणारी 69 लाख 60 हजार रुपये परत न देता त्यांची फसवणूक केली असल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. अधिक तपास पोलीस करत आहेत.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे