अर्धमसला मस्जिद मध्ये स्फोट घडून दोन समाजात तेड निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या दहशतवादी आरोपींवर UAPA,NSA कायद्यान्वये गुन्हे दाखल करा – मुस्ताक कुरेशी.
माजलगाव प्रतिनिधीं - किशन बी पवार

अर्धमसला मस्जिद ब्लास्ट मधे तलवाडा पोलिसांनी तातडीने कारवाई करून दोन दहशतवाद्यांना ताब्यात घेतले आहे. गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस पुढील तपास करीत आहे. परंतु गुन्हे दाखल करताना संधारण कलम लावण्यात आले आज दोन समाजात रमजान महिन्यात तेड निर्माण करण्यासाठी आरोपींनी पूर्ण प्रयत्न केला त्यांनी अगोदर इंस्टाग्राम वर रील तयार करून वायरल केली अत्यंत शांत डोके लावून या कामास घडून आणण्याचा काम या आरोपींनी केला परंतु याच्या मागे कोणतरी संघटना असून एवढा मोठा निर्णय दोघजण घेऊ शकत त नाही याचा तपास केला पाहिजे ..
29 तारखेला रात्री गावात संदल असताना आरोपी विजय रामा गव्हाणे व श्रीराम अशोक सागडे हे संदलीमध्ये मुस्लीम समाजाचे लोकांना उद्देशून जातीवाचक शिवीगाळ करून तुमचे येथे काय काम आहे असे म्हणुन शिवीगाळ करीत होते व म्हणत होते की, इथे मस्जिद कशाला बांधली ती पाडुन टाका नाहीतर आम्ही पाडु असे म्हणत होते.
त्यावेळी गावातील सरपंच व इतर नागरिकांनी त्यांची समजूत काढून परत पाठवले.
30 तारखेच्या पहाटे त्यांनी मशिदीत ब्लास्ट घडवून आणला..ही घटना Unlawful Activities (Prevention) Act. (UAPA) मधे बसत नाही का?
हा terorist अटॅक असल्याने प्रशासनाने स्वतः फिर्यादी होणे गरजेचे होते पण..पोलिसांनी दहशतवाद्यांकडे स्फोटक साहित्य कुठून आला याची चौकशी करून या घटनेमागे अजुन कोण आहेत हे समोर आणले पाहिजे.
29 तारखेला जे झालंय त्याची कल्पना स्थानिक पोलिसांना नव्हती का? UAPA,NSA कायदे अंतर्गत गुन्हा का दाखल केले नाहीत?
दहशतवाद्यांचे नार्को टेस्ट करून हा प्रकरण संघटित गुन्हेगारी सारखा प्रकरण आहे का याची चौकशी करावी.
आरोपी कोणत्या संघटन मध्ये असून त्याची कसून तपास करुन या मध्ये अजून कोण कोण शामिल आहेत संपूर्ण चौकशी करण्यात यावी.
रमजान महिन्यात दोन समाजात तेड निर्माण करण्यासाठी आरोपींनी मस्जिद मध्ये स्फोट घडून आणले या दहशतवादी व विविध कलम अंतर्गत वाढ करण्यात यावी,
तलवाडा पोलिसांनी अतिशय संवेदलशीतेने कारवाई करून तासाभरात आरोपींना ताब्यात घेतले परंतु सध्या कलम लाऊन गुन्हे दाखल केले असून त्यांची चौकशी करण्यात यावी.
UAPA.NSA कायद्यान्वये दहशतवादी व देशद्रोही चे गुन्हे दाखल करण्यात यावे.
कोणत्या समाजातील धार्मिक वर हल्ले होणार नाही व कोणी अशा प्रकारे हल्ले करणार नाही अशा हल्ले करणार नाही यांची दाखल घेऊन तात्काळ योग्य कारवाई करण्यात यावी.
दहशतवाद्यांकडून बीड जिल्ह्यात धार्मिक तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न संपूर्ण प्रयत्न झाला असून याच्या मागे कोणती संघटना आहे त्यांची नार्को टेस्ट करून तपास करण्यात यावी. अशी मागणी महाराष्ट्र युवक प्रतिष्ठान जिल्हा अध्यक्ष मुस्ताक कुरेशी यांनी ईमेल व्दारे जिल्हाधिकारी याच्या कडे करण्यात आली आहे नसता लोकशाही मार्ग विविध प्रकारचे आंदोलन करण्यात येईल अशी मागणी करण्यात आली.