
अहमदनगर जिल्ह्यातील काही भागात शुक्रवारी अनेक ठिकाणची झाडे उन्मळून पडली, तर पिकांचेही नुकसान झाले अहमदनगर शहर, कोपरगाव, पारनेर, अकोले आदी भागात वादळी वार्यासह पाऊस झाला.
पावसाने उकाड्यापासून नागरिकांची सुटका झाली. जोरदार वार्यासह झालेल्या पावसामुळे चारा पिके जमिनदोस्त झाली. हवामान खात्याने जिल्ह्यात ९ हे १३ मे या कालावागत वादळी, वान्यासह पावसाचा इशारा दिला होता. त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ यांनी नागरिक, शेतकन्यांना सतर्क राहण्याच्या सुचना दिल्या आहेत.
अकोले तालुयातील मुळा पट्ट्यात शुक्रवारी दुपारी वादळी पावसाने जोरदार हजेरी लावली. कोतूळ, वाघापूर, बोरी, धामणगाव पाट, अभीळ, मण्याडो, करंडी, ब्राह्मणवाडा परिसरांतील शेतीला अवकाळी पावसाचा जोरदार तडाखा बसला.
या पावसाने अनेक ठिकाणी घरांचे व छपरांचे पत्रे उडाले. टोमॅटो व झेंडू, चारापिके यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. आंबा उत्पादक शेतकर्यांचे मोठे नुकसान झाले. या अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी शेतक-यांनी केली आहे.