आयसीआयसीआय बँकेकडून 10 लाखाचे पर्सनल लोन घेतले तर किती रुपयांचा हप्ता भरावा लागणार..
अहिल्यानगर

आयसीआयसीआय ही देशातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी खाजगी बँक म्हणून ओळखली जाते. एचडीएफसी ही देशातील सर्वात मोठी प्रायव्हेट बँक आणि त्या पाठोपाठ आयसीआयसीआय बँकेचा नंबर लागतो.
या बँकेचे करोडो कस्टमर आहेत आणि बँक आपल्या करोडो ग्राहकांसाठी विविध प्रकारच्या योजना चालवत आहे. बँकेच्या माध्यमातून आपल्या ग्राहकांसाठी विविध प्रकारचे कर्ज कमी व्याजदरात उपलब्ध करून दिले जात आहे.
सार्वजनिक क्षेत्रातील एसबीआय असो की प्रायव्हेट सेक्टर मधील एचडीएफसी सर्वच बँका वैयक्तिक कर्जासाठी इतर कर्जांच्या तुलनेत अधिकचे व्याजदर आकारतात. आयसीआयसीआय बँक देखील वैयक्तिक कर्जासाठी इतर कर्जांच्या तुलनेत अधिकचे व्याज वसूल करत असून आज आपण आयसीआयसीआय बँकेच्या वैयक्तिक कर्जाची डिटेल माहिती पाहणार आहोत.
आयसीआयसीआय बँकेचे वैयक्तिक कर्जाचे व्याजदर
मिळालेल्या माहितीनुसार आयसीआयसीआय बँक आपल्या ग्राहकांना 50 लाख रुपयांपर्यंतचे वैयक्तिक कर्ज सहजतेने ऑफर करते. ज्या लोकांचा सिबिल स्कोर चांगला असतो त्यांना बँकेकडून अधिकचे वैयक्तिक कर्ज दिले जाते तसेच अशा लोकांकडून कमी व्याज वसूल केले जाते.
बँकेच्या वेबसाईट नुसार बँक आपल्या ग्राहकांना सहा वर्ष कालावधीसाठी वैयक्तिक कर्ज ऑफर करते. सहा वर्षे म्हणजेच 72 महिन्यांच्या कालावधीसाठी बँकेकडून आपल्या ग्राहकांना वैयक्तिक कर्ज दिले जाते आणि यासाठी कमीत कमी व्याजदर आकारण्याचा प्रयत्न बँकेकडून केला जातो.
महत्त्वाची बाब म्हणजे आयसीआयसीआय बँकेच्या अधिकृत संकेतस्थळावरून ग्राहकांना वैयक्तिक कर्जासाठी अर्ज करता येतो. म्हणजेच ग्राहकांना वैयक्तिक कर्ज घेण्यासाठी थेट बँकेत जाण्याची सुद्धा गरज नाही ग्राहक घरबसल्या वैयक्तिक कर्जासाठी अर्ज करू शकतात आणि कर्ज मिळवू शकतात.
मीडिया रिपोर्टनुसार आयसीआयसीआय बँक आपल्या ग्राहकांना 10.85% दराने वैयक्तिक कर्ज देते. जर समजा एखाद्या ग्राहकाने 10 लाख रुपयांचे वैयक्तिक कर्ज तीन वर्ष कालावधीसाठी घेतले आणि त्या ग्राहकाला हे कर्ज किमान 10.85% या व्याज दराने उपलब्ध झाले
तर त्याला 32 हजार 668 रुपये मासिक हप्ता भरावा लागणार आहे. म्हणजे सदर ग्राहकाला 11 लाख 76 हजार 48 रुपये भरावे लागतील यामध्ये दहा लाख रुपये मुद्दल आणि एक लाख 76 हजार 48 रुपये व्याज राहणार आहे.