ब्रेकिंगमहाराष्ट्र
नोकरीचे अमिष दाखवून महिलांची फसवणूक, गावातील काही राजकीय पुढाऱ्यांचा सहभाग
अहमदनगर

नगर तालुक्यातील जेऊर येथील अनेक महिलांना बनावट मसाला कंपनीचे नावाखाली लाखो रुपयांना गंडा घालण्यात आला आहे. या प्रकरणात गावातील काही राजकीय पुढाऱ्यांचा देखील सहभाग असल्याचा संशय आहे.
सदर प्रकरणाची सखोल चौकशी करून गुन्हे दाखल करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते शामभाऊ विधाते यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, जेऊर परिसरामधील महिलांना बनावट मसाला कंपनीच्या नावाखाली गंडा घालण्यात आला आहे. या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार नेवासा तालुक्यातील रहिवासी असून त्याने गावातीलच एका महिलेच्या आधाराने सर्वसामान्य महिलांना फसविले आहे.