ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्रसामाजिक

मार्कंडेय मंदिर सभामंडप भूमिपूजन कार्यक्रमास प्रारंभ

अहमदनगर

पदमशाली पंच कमिटी ज्ञाती समाज, श्री मार्कंडेय देवस्थान ट्रस्ट व समस्त पद्मशाली समाजाच्या वतीने दिनांक ८,९ व १० मे रोजी होणाऱ्या मार्कण्डेय मंदिर सभामंडप भूमिपूजन कार्यक्रमास सुरुवात झाली असून जास्तीत जास्त संख्येने समाज बांधव व भाविक भक्तांनी तीनही दिवस कार्यक्रमास उपस्थीत राहून कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन समस्त पदमशाली समाजाच्या वतीने आवाहन केले आहे.

अत्यंत भक्तिमय वातावरणामधे कार्यक्रमास सुरुवात झाली असून मंदिरा बाहेर मोठे सभा मंडप थाटण्यात आले असून मंदिराचे बाहेरील बाजूस व आतील बाजूस सुंदरपणे विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. मंदिराचा आतील बाजूने व श्री मार्कण्डेय महामुनीना सुगंधित फुलांनी सजविण्यात आले आहे.

सदरहू भूमिपूजन समारंभ संत महामुनिच्या हस्ते होणार असल्यामुळे संपूर्ण वातावरण भक्तिमय झाले आहे .

दिनांक ८ मे रोजी सकाळी गणेश पूजन,श्री मार्कण्डेय महारुद्राभिषेक, सायंकाळी ७ वा. भजन संध्या व महाप्रसाद दिनांक ९ मे रोजी होम हवन , पूजाविधी सायंकाळी ७ वा. श्री रामभक्त हनुमान सत्संग मंडळ ट्रस्ट प्रस्तुत हनुमान चालीसा व त्यानंतर महाप्रसाद व दिनांक १० मे २०२४ रोजी सकाळी ९ वा. श्री मार्कंडेय मंदिर सभामंडप भूमिपूजन समारंभ ह. भ. प. श्री जंगले महराज शास्त्री, डोंगरगण,प. पु. दिग्वजयनाथ महाराज, आळंदी व प. पू. संगमनाथ महाराज, श्री विशाल गणेश मंदिर यांच्या हस्ते व प्रशासकीय अधिकारी यांच्या उपस्थितीत होणार असल्याची माहिती समाजाच्या वतीने दिली असून या कार्यक्रमास जास्तीत जास्त संख्येने भाविक भक्तांनी उपस्थीत राहण्याचे आवाहन समस्त पदमशाली समाजाच्या वतीने केले आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे