
सिंहगड रस्त्यावरील नवशा मारुती मंदिरामागे असलेल्या टिव्हीएस सर्व्हिस सेंटरला आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीमध्ये जवळपास 20 ते 25 दुचाकी जळाल्या आहेत.
ही घटना सकाळी पावणे आठच्या सुमारास घडली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाची 5 वाहने घटनास्थळी दाखल झाली. अग्निशामक दलाच्या जवानांनी पाण्याचा मारा मारून आग विझवण्याचे प्रयत्न केले. आगीवर नियंत्रण मिळविल्यानंतर कुलिंगचे काम सुरू करण्यात आले आहे.