ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

कृषीवार्ताब्रेकिंग

टोमॅटो पाठोपाठ आता कांदाही महागणार..

मुंबई

टोमॅटोचे दर वाढल्यामुळे याचा परिणाम जेवणाच्या थाळीवरही झाला आहे. नुकत्याच रेटिंग एजन्सी क्रिसिल च्या अहवालानुसार, शाकाहारी थाळी  २८ टक्क्यांनी महागली आहे. टोमॅटोने सर्वसामान्यांची चिंता वाढवली असतानाच इतर भाज्यांचे दरही वाढले आहेत.

त्यात आता या महिन्याच्या अखेरीस किरकोळ बाजारात कांद्याच्या किंमतीत वाढ होण्याची शक्यता आहे.

पाऊस आणि पुराचा परिणाम आता कांद्यावरही होऊ लागला आहे. राजस्थान, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रातून कांद्याचा पुरवठा आता हळूहळू कमी होत आहे. साठ्यात ठेवलेला कांदा पुढील महिन्यापासून बाहेर पडण्यास सुरुवात होणार असून त्यामुळेच येत्या काही दिवसांत कांद्याचे भाव वाढणार आहेत.

सध्या कांदा ३० रुपये किलोने बाजारात विकला जात आहे. मात्र, व्यापारी ज्या प्रकारे चिंता व्यक्त करत आहेत, त्यावरून भविष्यात कांदा ४० ते ५० रुपये किलोपर्यंत जाण्याची शक्यता आहे.

व्यापाऱ्यांनी सांगितले की, कांद्याचे भाव आता काही काळ स्थिर आहेत. परंतु, येत्या काही दिवसांत कांद्याचे भाव वाढू शकतात. पावसामुळे राजस्थान, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रातून कांद्याचा पुरवठा हळूहळू कमी झाला आहे. याचाच अर्थ पूर आणि पावसाचा कांद्यावर परिणाम झाला आहे. तर, ज्या कांद्याचा साठा करून ठेवलेला आहे. तो आता हळूहळू बाहेर पडू लागेल, त्यामुळे कांद्याचे भाव वाढणार आहेत.

त्यामुळेच सध्या बाजारात २० आणि २२ रुपये किलोने उपलब्ध असलेला आणि किरकोळ बाजारात ३० रुपये किलोने उपलब्ध असलेला कांदा येत्या काही दिवसांत ४० ते ५० रुपये प्रतिकिलो होऊ शकतो, असा अंदाज वर्तवला जात आहे.

त्यामुळे व्यापाऱ्यां बरोबरच सर्वसामान्य नागरिकांमध्ये देखील चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

 

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे