ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

अहमदनगर जिल्ह्यात ढगफुटीसदृश पाऊस..नदीला पूर, पूल खचला, शेतात पाणीच पाणी

अहमदनगर जिल्ह्यामध्ये दोन दिवसांपासून पावसाने जोरदार हजेरी लावलेली आहे. काल (दि.१४) पावसाने बहुतांश भागात हजेरी लावली. काही ठिकाणी जोरदार तर काही ठिकाणी रिपरिप सुरु होती. दरम्यान काल अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यात ढगफुटीसदृश्य पाऊस झाला.

या पावसाने नदीस पूर आला होता तर काही पूल देखील खचले होते. साकत परिसरात रविवारी (दि. १४) दुपारी ढगफुटीसदृश पावसाने दाणादाण उडविली.

पिंपळवाडीजवळील लेडी नदीला मोठा पूर आला असून, कडभनवाडी, कोल्हेवाडी, हनुमानवाडी, तसेच अनेक वस्त्यांचा संपर्क तुटला. रानात शेतीकामासाठी गेलेले शेतकरीही नदीच्या पलीकडेच अडकून राहिले. वीजपुरवठाही खंडित झाला. साकत ग्रामपंचायतीच्या अंतर्गत असलेल्या पिंपळवाडी गावातील लेंडी नदीवर असलेला पूल अतिवृष्टी आणि पुरामुळे खचला आहे. त्यामुळे वाहनचालकांनी या पुलावरून जाऊ नये, असे आवाहन करण्यात आले आहे.

पिंपळवाडी ग्रामस्थांनी भरपावसात नदीकाठी येऊन वाहनचालकांना आवाहन केले व वाहने माघारी पाठविली.शेतात देखील सगळीकडे पाणी साचले होते. शेतकऱ्यांचे सोयाबीन पीक व इतर पिकेही पाण्याखाली गेल्याचे चित्र होते.

शेळ्यांसह ‘तो’ ही चालला वाहून, पण …

साकत – कोल्हेवाडी मार्गावर साकतजवळ पुलावरून मोठ्या प्रमाणावर पाणी असल्याने या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. तसेच वराट वस्ती, कडभनवाडी या ठिकाणचा संपर्क तुटला आहे.

लेंडी नदीला पूर आला.

यातच जनार्दन घोलप यांच्या शेळ्या वाहून चालल्या होत्या. शेळ्या पकडण्यासाठी ते गेले असता तेही वाहून चालले होते. मात्र, ग्रामस्थांनी तातडीने मदत केली. शेळ्या व घोलप यांना बाहेर काढले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे