ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

दिलखुलास गप्पामहाराष्ट्र

अष्टपैलू कलाकार – श्रीमती विजया गुंडू यांच्या शी दिलखुलास‌ गप्पा..

अहमदनगर प्रतिनिधी

प्रत्येक हृदयाची एक अबोल अशी भाषा असते. ती काहींच्या डोळ्यातून, काहींच्या मनातून , काहींच्या अंतर मनापासून, तर काहींच्या स्मित हास्यातुन , तर काहींच्या कलाकारी तून व्यक्त होते.. अशा या व्यक्तीमत्वाच्या विजया गुंडू..

श्रीमती विजया गुंडू गेले ३० वर्षांपासून त्यांच्या कलेतुन      मोती, लोकर, कागदी फुले यांच्या पासुन खुप आकर्षक वस्तू बनवतात. आणि माऊथ टु माऊथ , हॅण्ड टु हॅण्ड त्यांच्या वस्तुंची पब्लिसिटी आपोआप होत असते.

श्रीमती विजया या मुळच्या मुंबईत डोंबिवली च्या राहणारे‌ आहेत. त्यांचा जन्म १९५० साली मुंबई मध्ये गडगंज श्रीमंत घरात झाला.

त्यांचे वडील आयुर्वेदिक डॉक्टर होते. तसेच आई कित्येक लहान मुलांना गुटी पाजायची.त्यामुळे त्यांना आयुर्वेदिक औषधांचे ज्ञान आहे.

वयाच्या दहाव्या वर्षी पासुन आज त्यांचे वय ७३ या वयात सुध्दा त्या खुप ॲक्टीव्ह आहेत..

घरात कधीच एका ही कामाला हात लावला नाही.. त्यांचे लग्न १९६८ साली दत्तात्रय गुंडू यांच्या शी झाले. त्या अहमदनगर मध्ये गुंडू साडी या नावाजलेल्या घरात एकत्र कुटुंबात आल्या.. पण लग्न झाल्यावर गेले २८ वर्ष नुसते घर सांभाळणे थोडक्यात चुल , मुलं हेच त्या आनंदाने करत राहिल्या.. त्यांना २ मुले आणि मुलगी आहे. मुलांच्या शाळा, अभ्यास, क्लास घेणे.. असा त्यांचा दिनक्रम होता.. कित्येक वर्षे त्यांनी मुलांचे क्लास घेतले.‌

त्यांचे मिस्टर देवा घरी गेल्या नंतर त्यांचा एकटे पणा , दुःख विसरण्या साठी त्या या हाताने बनवलेल्या वस्तू तयार करण्यात वेळ घालवत असतात. त्या मोत्यांपासुन , लोकरी, कागदी फुले यापासुन वेगळे वेगळे पर्स, रुखवत वस्तू, डोहाळे जेवणा चे दागिने, गणपती महालक्ष्मी चे दागिने, शोपिस असे बनवून विकतात.

त्यांनी कधीही यु ट्युब वर बघुन किंवा क्लास ला जाऊन कोणतेही वस्तू शिकल्या नाहीत. त्यांनी एखादी वस्तू बघितले की घरी येऊन त्या तयार करायच्या.. घरात ला सपोर्ट खुप महत्वाचा असतो.. त्यांना त्यांच्या कामा मध्ये मुलगी, जावई दोन्ही सुना, मुले, नातवंडे खुप छान सपोर्ट करतात.. त्यांची नात ही  मुंबई मध्ये बासरी वादक आहे.

विजया ताई या खुप धार्मिक आणि अध्यात्मिक आहेत. त्यांची श्री कृष्णा वर खुप भक्ती आहे. तसेच त्या मंदिरात किंवा कोणी सांगितले तर त्या प्रवचन ही सांगतात. त्यांचे म्हणणे आहे की जीवनात मिठाची जेवढी जास्त गरज आहे तेवढीच भक्ती ची गरज आहे. त्यांना गाणी, डान्स, वाचनाची खुप आवड आहे. तसेच त्या पाककृती मध्ये ही खुप हुशार आहेत.

त्या संपुर्ण भारत आणि चारधाम, आठधाम सर्व ठिकाणी त्या फिरून आल्या आहेत. त्यांची एकच इच्छा राहिली आहे आणि ती म्हणजे परदेश वारी ( इंग्लंड दौरा ) त्या लवकर च पुर्ण करणार आहेत.

२०१८ साली त्यांना अहमदनगर मध्ये पद्मकन्या हा पुरस्कार देण्यात आला आहे.

अशा या अष्टपैलू व्यक्तिमत्त्वास त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा…

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे