
सेंट विवेकानंद इंग्लिश स्कूलसाठी एक अभिमानाचा क्षण
28 जुलै 2023 रोजी 18 वी जिल्हास्तरीय इंग्रजी वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. याचे आयोजन सेंट झेवियर्स हायस्कूल, श्रीरामपूर यांनी केले होते.
जिल्ह्यातील 33 शाळांनी सहभाग घेतला होता. मरियम खान (इयत्ता दहावी) आणि पलक पटनी (इयत्ता नववी) यांना शाळेसाठी तृतीय कंसोलेशन पारितोषिक मिळाले. त्यांना 500 रुपये रोख बक्षीस मिळाले. विद्यार्थ्यांनी अतिशय उत्तम कामगिरी केली.
मुलांची अशीच उतरोत्तर प्रगती व्हावी आणि असेच बक्षीसे विद्यार्थ्यांनी शाळेसाठी मिळवावेत असे अध्यक्ष दामोधर बठेजा म्हणाले .
दर वर्षी शाळेतून विद्यार्थ्यांना अशा वेगवेगळ्या स्पर्धांना मुलांना पाठवून त्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळतो व एक आत्मविश्वास वाढतो असे प्राचार्या गीता तांबे म्हणाल्या.
आणि आंतरशालेय स्पर्धांमधून परंपरे प्रमाणे सेंट विवेकानंद इंग्लिश स्कूल चे विद्यार्थी बक्षीसे पटकवतात असे उपप्राचार्य कांचन पापडेजा म्हणाल्या. मुख्याध्यापिका गोदावरी कीर्तानी यांनी ही मुलांचे अभिनंदन केले.
आणि सर्व विश्र्वस्थांनी दोन्ही मुलींचे भरभरून कौतुक केले.
त्यांना शिरीन शेख, मनीष आहुजा, आशा रंगलानी, समिना पटेल, गीता दुमाटे, दिव्या पोखरणा यांनी मार्गदर्शन केले.