ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

नगर शहरात कापड बाजारामध्ये हिरवा गुलाल उधळला, ही हिंमत कुठून आली – आमदार संग्राम जगताप

अहिल्यानगर- पाईपलाईन रोड पंचवटी नगर येथील श्रीराम मंदिरातील श्रीमद भागवत कथेचा समारोप,भाविकांना भगवत गीतेचे वाटप.

आमदार संग्राम जगताप, माजी खासदार सुजय विखे पाटील आणि भिमाबाई बारस्कर यांची ग्रंथ तुला.

विधानसभा निवडणुकीमध्ये हिरव्या सापा बरोबर महाविकास आघाडीचा बंदोबस्त केला : आमदार संग्राम जगताप.

अहिल्यानगर मध्ये पंचवटी नगर श्रीराम मंदिरात ७ दिवस सुरू असलेल्या श्रीमद भागवत कथेचा हजारो नागरिकांनी आनंद घेतला असून बारस्कर कुटुंबीय धार्मिकतेचे कार्य पुढे घेऊन जाण्याचे काम करत आहे, लोकसभेच्या निवडणुकीमध्ये एका समुदायाने वेगळी भूमिका घेतली असल्यामुळे उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, राज्यस्थानमध्ये वेगळे निकाल लागले याचे कारण म्हणजे आपण गाफील राहिलो, लोकसभेचा निकाल लागताच शहरातील कापड बाजारामध्ये हिरवा गुलाल उधळला, ही हिंमत कुठून आली यासाठी आपला धर्म वाचवायचा असेल तर राजकारण बाजूला ठेवून हिंदू धर्मासाठी सर्वांनी एकत्र येणे गरजेचे आहे. गणपती विसर्जन मिरवणुकीत काही लोक केडगाव मधून आले आणि त्यांनी कवाली वाजवली, आता ही प्रथा सुरू होईल कव्वाली आम्ही देखील वाजू मात्र त्या एका समुदायाने मोहरम मध्ये गणपती चे गाणे वाजवले तर आम्ही देखील कव्वाली वाजव, आपण कुठपर्यंत सहन करायचे हे असे चालू राहिले तर आपल्या डोक्यावर हिरव्या टोपे येतील, विधानसभा निवडणुकीमध्ये हिरव्या सापाबरोबर महाविकास आघाडीचा बंदोबस्त केला आहे.

आपल्या मंदिरांसमोर थडगे उभारायचे आणि हळूहळू पाय पसरायचे आणि नंतर वक्त बोर्ड हक्क सांगणार मज्जिद मध्ये देखील प्रभू रामचंद्र व गणपती मंदिर असलेले दाखवा. आता सिद्धटेक नंतर बालिकाश्रम रस्त्यावरील थडगे काढण्यासाठी महापालिकेकडे पत्र व्यवहार केला आहे. ३१ तारखेच्या आत काढले नाही तर सिद्धटेकला जे घडले ते अहिल्यानगर मध्ये देखील घडले जाईल या लोकांचा एकत्र राहून बंदोबस्त करावा लागेल.

आपल्या धर्माचा योग्य विचार व प्रचार समाजामध्ये घेऊन जाण्याचे काम आपल्या सर्वांना करायचे आहे. धर्माच्या माध्यमातून सुसंस्कृत पिढी निर्माण होत असते, माजी नगरसेविका दिपालीताई बाळासाहेब बारस्कर यांनी विकासाला धार्मिकतेची जोड दिले असून, भागवत कथेच्या माध्यमातून संस्काराची शिदोरी वाटण्याचे काम केले असल्याचे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले.

पाईपलाईन रोड पंचवटी नगर येथील श्रीराम मंदिर येथे बारस्कर कुटुंब यांच्या वतीने भागवत कथेच्या समारोप प्रसंगी भगवत गीतेचे भाविकांना वाटप करण्यात आले. यावेळी आमदार संग्राम जगताप, माजी खासदार डॉ.सुजय विखे पाटील, सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब बारस्कर, माजी नगरसेविका दीपालीताई बारस्कर, माजी नगरसेवक दत्ता पाटील सप्रे,सतीश बारस्कर, महेश तवले, शारदाताई ढवण, अनिल ढवण, सचिन बारस्कर, भिमाबाई बारस्कर आदीसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अहिल्यानगर शहरांमध्ये विकासाचे काही काम मागे राहिले होते. आता आम्ही दोघे मिळून पूर्ण करू, आमदार संग्राम जगताप यांची वेगळी भूमिका पाहिला मिळाली मात्र मी पाच वर्षांपूर्वीच ही भूमिका घेतली होती. आता आम्ही दोघे मिळून हा विषय पुढे नेऊ भागवत कथेतून नागरिकांमध्ये धार्मिकतेची गोडी निर्माण होत असते.

त्या माध्यमातून आनंदी जीवन जगण्याचा मार्ग मिळतो. बारस्कर कुटुंबाच्या वतीने आमच्या वजना एवढ्या भागवत गीतेचे वाटप केले. हा उपक्रम कौतुकास्पद आहे. ह.भ.प मंदार बुवा रामदासी महाराज यांच्या वाणीमुळे श्रोते मंत्रमुग्ध झाले. माजी नगरसेविका दिपालीताई बारस्कर कार्यक्षम नगरसेविका म्हणून ओळखल्या जात असल्याचे मत मा.खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांनी व्यक्त केले.

पाईपलाईन रोड पंचवटी नगर येथे सात दिवस भागवत कथा मोठ्या उत्साहात संपन्न झाली. आज कथेचा समारोप होत असून मनाला हुरहुर लागली आहे. पाईपलाईन उपनगर हे माझे माहेर घर आहे. परमेश्वर आपल्याकडून धार्मिकतेचे चांगले कार्य घडून घेत असतो, कथेच्या माध्यमातून माणसे जोडले जातात, त्या माध्यमातून एकमेकांमध्ये स्नेहबंध तयार होऊन आपुलकीची, प्रेमाची भावना निर्माण होत असते, असे मत माजी नगरसेविका दिपालीताई बारस्कर यांनी व्यक्त केले.

भागवत कथेमध्ये आमच्या आई भिमाबाई बारस्कर, आमदार संग्राम जगताप, माजी खासदार सुजय विखे पाटील यांची ग्रंथ तुला केले असून. त्यांच्या वजना एवढे भागवत गीतेची वाटप नागरिकांना करण्यात आले.

तसेच जीवनसार पुस्तकाचे लेखक बाळासाहेब जाधव यांना साहित्यरत्न पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. आणि हिराबाई बारस्कर- औटी यांना यशस्वी महिला उद्योजिका पुरस्काराने सन्मानित करण्यात आले, असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब बारस्कर यांनी दिली.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे