ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

अहिल्यानगरच्या डॉ. हृषिकेश पंडित यांची केनियात ‘लॅपरोस्कोपी मॅरेथॉन’

अहिल्यानगर

आंतरराष्ट्रीय स्तरावर जिल्ह्याचा नावलौकिक.

अहिल्यानगर वैद्यकीय क्षेत्रातील प्रगत तंत्रज्ञानात हातखंडा मिळवत आपल्या अचूक कौशल्याने अहिल्यानगरमधील प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. हृषिकेश पंडित यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर जिल्ह्याचा नावलौकिक वाढवला आहे. केनियाची राजधानी नैरोबी येथील प्रतिष्ठित ‘एस्टर हॉस्पिटल’ येथे आयोजित विशेष ‘लॅपरोस्कोपी कार्यशाळेमध्ये त्यांना स्त्री रोगावरील गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले होते.

यात सहभागी होत डॉ.‌पंडित यांनी अत्यंत गुंतागुंतीच्या मानल्या जाणाऱ्या अनेक स्त्रीरोग शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पाडल्या.

नैरोबी येथील प्रसिद्ध प्रा. रफिक पारकर आणि प्रा. जोसेफ वायोईके यांच्या निमंत्रणावरून डॉ . पंडित या कार्यशाळेत सहभागी झाले होते. त्यांनी जटिल शस्त्रक्रिया दुर्बिणी सहाय्याने यशस्वीरित्या केल्या.

एण्डोमेट्रोसीस , फायब्रॉइड्स आणि गर्भाशय काढण्याच्या शस्त्रक्रिया, वंध्यत्व निवारणासाठी उपयुक्त ठरणारी ‘फर्टिलिटी-प्रिझर्व्हिंग शस्त्रक्रिया अतिशय कुशलतेने करून डॉ. पंडित यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर ठसा उमटवला.

विशेषतः ज्या रुग्णांवर यापूर्वी ४ वेळा शस्त्रक्रिया होऊनही यश आले नव्हते, अशा अत्यंत गंभीर ग्रेड ४ एण्डोमेट्री ओसीसने त्रस्त महिलेवर डॉ. पंडित यांनी लॅपरोस्कोपीद्वारे यशस्वी शस्त्रक्रिया केली. त्यांच्या या कौशल्याचे तेथील तज्ज्ञांनी विशेष कौतुक केले.

 

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे