ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

जिल्हा बॅंकेच्या अध्यक्षांसह आठ संचालक अपात्र ठरविण्याची मागणी

सांगली

जिल्हा बँकेचे अध्यक्ष मानसिंगराव नाईक यांच्यासह आठ संचालकांना १० वर्षाहून अधिक काळ कार्यकाळ पूर्ण झाला असल्याने त्यांना तात्काळ अपात्र ठरविण्यात यावे अशी मागणी करणारे निवेदन स्वतंत्र भारत पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुनील फराटे यांनी सोमवारी विभागीय सह निबंधक कोल्हापूर यांना दिले.

केंद्र सरकारच्या अर्थ मंत्रालयाने बँकिंग सुधारणा अधिनियम लागू केला आहे.यानुसार सहकारी संस्थामध्ये सलग १० वर्षे संचालक पदावर कार्य केल्यानंतर त्यापुढे संबंधित व्यक्तीला संचालक म्हणून काम करता येणार नाही, आणि संचालक पदाच्या निवडणूक लढविण्यासही तो अपात्र ठरेल अशी तरतूद या अधिनियमात आहे. या अधिनियमानुसार जिल्हा बँकेतील आठ विद्यमान संचालक अपात्र ठरतात.

यामध्ये विद्यमान अध्यक्ष नाईक यांच्यासह खासदार विशाल पाटील, माजी अध्यक्ष दिलीप पाटील, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख, महेद्र लाड, माजी आमदार मोहनराव कदम, सुरेश पाटील व बाळासाहेब होनमोरे यांचा समावेश आहे. या आठजणांचा संचालक म्हणून कार्यकाळ सलग ११ वर्षे पूर्ण झाला असल्याने ते अपात्र ठरतात असे श्री. फराटे यांनी निवेदनात म्हटले आहे.

बँकिंग सुधारणा अधिनियमातील तरतुदीनुसार या आठ जणांना संचालक म्हणून काम करण्यास अपात्र ठरविण्यात यावे अशी मागणी त्यांनी केली आहे. या निवेदनाची प्रत सहकार आयुक्तांनाही देण्यात आली आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे