पदमशाली कायदेशीर सल्लागार समिती वर अँड. सिरसूल, अँड. सौ.बोडखे व अँड. मच्चा बिनविरोध
अहिल्यानगर

पद्मशाली पंचकमिटी ज्ञाती समाजाच्या वतीने समाजातील सर्व वकिलांची बैठक घेऊन त्रिसदसिय कमिटी स्थापन करण्यात येऊन या समिती वर अँड. व्यंकटेश सिरसूल, अँड.सौ. सुजाता बोडखे व अँड.दिपक मच्चा यांची बिनविरोध निवड झाल्याची माहिती पदमशाली पंचकमिटी चे अध्यक्ष श्रीनिवास बोज्जा यांनी दिली.
पद्मशाली समाजातील सर्व वकिलांची नुकतीच बैठक पंचकमिटी च्या वतीने संपन्न झाली.पदमशाली समाजातील नागरिकांना कायदेशीर सल्ला सुलभ रीतीने मिळावे, समाजामध्ये पती पत्नी वाद, कौटुंबिक वाद संपुष्टात येणे कामी या समिती चे गठणं केले असून याचा लाभ समाजाने घ्यावा असे आवाहन श्री मार्कंडेय देवस्थान चे अध्यक्ष गणेश विद्ये यांनी दिले.
सदर स्थापन केलेली कमिटी ही एक वर्षाकरिता असून त्या नंतर नवीन कमिटी नेमण्यात येईल. तसेच या कमिटी मध्ये इतर सदस्य म्हणून अँड. देविदास गाली,अँड.नोटरी मोहन येनगंदूल, अँड.नोटरी प्रमोद जेटला, अँड. नोटरी राजू गाली,अँड.महेश आनंदास, अँड.गौरी सामलेटी, अँड.लक्ष्मीछाया रामदिन, अँड. प्रतीक्षा मंगलराम व अँड.लक्ष्मी लखापती यांची निवड केली असून कमिटी चे मार्गदर्शक म्हणून अँड. पांडुरंग बल्लाळ व अँड.दिपक जेटला यांची नेमणूक करण्यात आली.
या बैठकीत सर्व वकिलांनी चर्चेत भाग घेऊन सर्वानुमते अँड. सिरसूल,अँड.बोडखे व अँड. मच्चा यांची बिनविरोध निवड करण्यात आली. या वेळी निवड झालेल्या सदस्यांनी नक्कीच आम्ही सामाजिक बांधिलकी म्हणून काम करू व समाजाच्या प्रत्येक घटकाला कायदेशीर मदत कसे करता येईल याचा प्रयत्न करू असे म्हणाले.
लवकरच प्रत्येक आठवड्याचे शनिवारी व रविवारी दोन तास कायदेशीर मार्गदर्शन मार्कंडेय संकुल येथे वकिलांच्या वतीने देण्यात येईल व त्याचे नियोजन लवकरच करण्यात येईल अशी माहिती जेष्ठ विश्वस्तअँड. कुमार आडेप यांनी दिली.
या वेळी पंचकमिटी व देवस्थान चे ज्ञानेश्वर मंगलारप, अमित बुरा, विनोद बोगा, पुरषोत्तम बुरा, त्रिलेश येनगंदुल आदी उपस्थित होते.




