ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र

माळीवाडा बसस्थानक परिसरातुन जेष्ठ महिलेचे मंगळसूत्र लांबविले.

माळीवाडा बसस्थानक परिसरातुन जेष्ठ महिलेचे मंगळसूत्र लांबविले माळीवाडा बसस्थानक परिसरात बसमध्ये चढत असताना ज्येष्ठ महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र लांबवल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ज्येष्ठ महिला आपल्या गावी जाण्यासाठी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास बसस्थानकावर आल्या होत्या. बसमध्ये चढत असताना प्रवाशांची मोठी गर्दी होती.

या गर्दीचा फायदा घेऊन अज्ञात चोरट्याने महिलांच्या गळ्यातील नऊ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र अत्यंत शिताफीने लंपास केले. दागिने चोरी झाल्याचे लक्षात येताच पीडित महिला तातडीने कोतवाली पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. सदर प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार संदीप पितळे करत आहेत.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे