ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र

नगर शहरात रिक्षा थांबविण्याच्या वादातून रिक्षाचालकावर जीवघेणा हल्ला

अहिल्यानगर

अहिल्यानगर-येथील माळीवाडा बस स्थानक परिसरात रिक्षा थांबवण्याच्या किरकोळ वादातून दोन आरोपींनी एका रिक्षाचालकावर शिवीगाळ करत लोखंडी अँगलने डोयात वार करून गंभीर जखमी केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात दोन आरोपींविरोधात विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दिलेल्या माहितीनुसार, सिराज इब्राहिम सय्यद (वय २०, रा. शहा कॉलनी, भिंगार) हे रिक्षाचालक दि. २० नोव्हेंबर २०२५ रोजी दुपारी ४:३० वाजण्याच्या सुमारास माळीवाडा बस स्थानकाजवळील पार्सल गेटसमोर प्रवाशांना उतरवत होते.

त्याच वेळी आरोपी वसंत रंगनाथ मोकाटे (रा. जाधव मळा, बुरुडगाव रोड) आणि नवनाथ विष्णु सातपुते (रा. सावेडी नाका) हे दोघे तेथे आले. तू येथे का आलास, तू येथे गाडी थांबवायची नाही असे म्हणत त्यांनी फिर्यादीला शिवीगाळ केली.

या दोघांनी रिक्षाचालक सिराज सय्यद यांना रिक्षातून बाहेर काढले. त्यानंतर हाताच्या चापटीने, बुक्क्यांनी आणि लाथांनी मारहाण केली. आरोपी क्रमांक दोन, नवनाथ सातपुते, याने जवळ असलेला लोखंडी अँगल घेऊन फिर्यादीच्या डोयात मारून गंभीर जखमी केले.

या जीवघेण्या हल्ल्यानंतर जखमी रिक्षाचालक सिराज सय्यद यांनी तातडीने सिव्हिल हॉस्पिटल, अहिल्यानगर येथे उपचार घेतले. त्यानंतर त्यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात येऊन तक्रार दिली.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे