ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

आरोग्य व शिक्षणब्रेकिंगमहाराष्ट्र

वर्धमान महावीर कॉलेज ऑफ ऑप्टोमेट्री येथे डिप्लोमा इन ऑप्टोमेट्री अभ्यासक्रमासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू

अहिल्यानगर

वर्धमान महावीर कॉलेज ऑफ ऑप्टोमेट्री येथे डिप्लोमा इन ऑप्टोमेट्री अभ्यासक्रमासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू प्रवेशासाठी ३० नोव्हेंबर २०२५ पर्यंत अंतिम मुदत आहे.

आताच्या काळात नेत्र विज्ञान क्षेत्रात चांगल्या करिअरच्या अनेक संधी उपलब्ध झाल्या आहेत. डोळे तपासणी, चष्म्याचा नंबर काढणे, काचा बनवणे अशा तांत्रिक अभ्यासासाठी ऑप्टोमेट्री अभ्यासक्रम उपयुक्त आहे. यादृष्टीने आनंदऋषीजी हॉस्पिटल संलग्नित वर्धमान महावीर कॉलेज ऑफ ऑप्टोमेट्री (आऩंदऋषीजी नेत्रालय) येथे डिप्लोमा इन ऑप्टोमेट्री अभ्यासक्रम सुरू झाला आहे.

दोन वर्षांच्या या अभ्यासक्रमासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून जीवशास्त्रासह (PCB) बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळणार आहे. सदर कॉलेज नाशिक येथील एमयुएचएसशी (MUHS-Mahrashtra University of Health Sciences) संलग्न आहे.

डिप्लोमा इन ऑप्टोमेट्री या दोन वर्षांच्या अभ्यासक्रमात ६ महिने इंटर्नशिपचा समावेश आहे. इंग्रजी भाषेत अध्यापन केले जाते. इंग्रजी कौशल्य, व्यक्तिमत्त्व विकास, शिष्टाचार प्रशिक्षणासह आधुनिक शिक्षणाचा यात समावेश आहे.

या सुसंधीचा इच्छुक विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे. सदर अभ्यासक्रम चालवणारे हे नगर जिल्ह्यातील पहिलेच कॉलेज आहे.

या अभ्यासक्रमासाठी २० जागा असून प्रथम येणाऱ्यांना प्राधान्य देण्यात येणार आहे. प्रवेशासाठी ३० नोव्हेंबर २०२५ पर्यंत अंतिम मुदत आहे.

दरवर्षी फी रु.३०,०००/- फक्त प्रवेश प्रक्रिया व अधिक माहितीसाठी संपर्क – वर्धमान महावीर कॉलेज ऑफ ऑप्टोमेट्री, आनंद ऋषीजी नेत्रालय आनंद ऋषीजी मार्ग अहिल्या नगर.

संपर्क- मो. ८६८६४०१५१५/ ८६८६३०१५१५.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे