उद्या महाराष्ट्रावर मोठं संकट – हवामान विभागाकडून मोठा इशारा बुधवारी जोरदार पाऊस होणार…

उद्या महाराष्ट्रावर मोठं संकट, महत्वाच्या कामाशिवाय घराबाहेर पडणे टाळा..मागील काही दिवसांपासून पाऊस कमी झाल्याचे चित्र आहे. मात्र, आता हवामान विभागाकडून मोठा इशारा हा देण्यात आलाय. बुधवारी जोरदार पाऊस होणार आहे.
मुंबईसह आजूबाजूच्या परिसरात तसेत राज्यातील काही भागात बुधवारी मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस होणार आहे. या आठवड्यात बुधवार 13 ऑगस्टला बंगालच्या वायव्य उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण होणार आहे.
या पार्श्वभूमीवर राज्यात 12 ऑगस्ट ते 14 ऑगस्टदरम्यान विदर्भ, तसेच कोकणात काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. यामुळे जर गरज असेल तरच घराबाहेर पडा असा इशारा हवामान खात्याने नागरिकांना दिला आहे.
दरम्यान, राज्यातील अनेक भागांमध्ये पाऊस नसल्याने पिके संकटात आली असून बळीराजा चिंतेत असल्याचे बघायला मिळत आहे. राज्यातील काही भागांमध्ये अजूनही समाधानकारण पाऊस झाला नाहीये.