गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र
नगरचे ग्रामदैवत श्री विशाल गणपती व महात्मा ज्योतिबा फुले पुतळा, माळीवाडा परिसरात गेल्या काही दिवसांपासून खुलेआम वेश्या व्यवसाय सुरु
अहिल्यानगर

नगरचे ग्रामदैवत श्री विशाल गणपती व महात्मा ज्योतिबा फुले पुतळा, माळीवाडा परिसरात गेल्या काही दिवसांपासून खुलेआम वेश्या व्यवसाय सुरु असून, परिसरातील नागरिकांना त्यामुळे प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.
या भागात मोठ्या प्रमाणावर निवासी घरे असून महिला व मुलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. अशा मागणीचे निवेदन श्री विशाल गणेश मंदिर व श्री संत सावता महाराज उत्सव समिती यांच्या वतीने कोतवालीचे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांना दिले आहे.