ब्रेकिंगमहाराष्ट्रसामाजिक
दिव्यदृष्टी दिव्यांग विकास व संशोधन संस्था’ आणि ‘स्वरसृष्टी संगीत मंच’ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘स्वर दिपावली’ या विशेष सांगीतिक मैफिलीचे आयोजन
अहिल्यानगर
‘दिव्यदृष्टी दिव्यांग विकास व संशोधन संस्था’ आणि ‘स्वरसृष्टी संगीत मंच’ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘स्वर दिपावली’ या विशेष सांगीतिक मैफिलीचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात दिव्यांग युवक व युवतींचा सहभाग असलेला मराठी-हिंदी भावगीत, भक्तीगीत आणि सदाबहार चित्रपट गीतांचा बहारदार ऑर्केस्ट्रा रंगणार आहे.
हा कार्यक्रम २७ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजता ‘माऊली सांस्कृतिक सभागृह’ येथे होणार आहे. या अनोख्या स्वरोत्सवात सामील होऊन आपल्या उपस्थितीने या दिव्यांग कलाकारांचा उत्साह आणि आत्मविश्वास दुप्पट करण्याचे आवाहन कृष्णा तवले यांनी केले आहे.



