
विश्व निर्मल फौंडेशन संचलित किड्स सेकंड होम प्री प्रायमरी सहज पब्लिक स्कुल मध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती विदयार्थ्यांच्या पालकांच्या हस्ते महाराजांना हार अर्पण करून साजरी करण्यात आली.
शाळेतील अनेक विदयार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज, माँ जिजाऊ व मावळ्यांचे पोशाख परिदान केले होते, या वेळी विदयार्थ्यांनी शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित नाटक बसविले व सर्व पालकांसमोर त्याचे सादरीकरण केले. या वेळी पालक वर्ग महिला मोठया प्रमाणात उपस्थित होते.
संस्थेचे कोषाध्यक्ष संदीप गांगर्डे, डान्स टीचर शुभम भालदंड, प्रिन्सिपल संगीता गांगर्डे वैष्णवी नजन, सौ.आरती हिवारकर, सौ. रुपाली जोशी, सौ. पूजा चव्हाण, प्रवीण वाघमारे सर यांनी अथक परिश्रम घेतले.