ब्रेकिंगमहाराष्ट्र
हल्दीरामची फ्रेंचायजी देण्याच्या बहाण्याने 6 लाखांची फसवणूक
पुणे - पुण्यातील चंदननगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल.

हल्दीरामची फ्रेंचायजी देण्याच्या बहाण्याने एका तरुणाची 5 लाख 87 हजार 500 रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. याप्रकरणी मयंक अरविंद कुमारसिंग (वय-29, रा. खराडी,पुणे) याने चंदननगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
त्यानुसार अज्ञात मोबाईल धारक, इमेल खाते धारक आणि बँक खातेधारकावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 28 ऑगस्ट ते 12 सप्टेंबर दरम्यानच्या काळात घडली अशी माहिती पोलिसांनी दिली.