श्री राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्या निमित्त फटाका विक्री साठी परवानगी मिळणे कमी निवेदन
अहमदनगर

फटाका असो चे वतीने मा. जिल्हाधिकारी व एस पी साहेब यांना निवेदन
अयोध्या येथे 22 जानेवारी 2024 रोजी श्री राममंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा साठी फटाका विक्री करणेस परवानगी मिळावी म्हणून दि अहमदनगर फटाका व्यापारी असो चे वतीने मा. निवासी जिल्हाधिकारी श्री. पाटील साहेब व जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. ओला साहेब यांना निवेदन देण्यात आले.
या वेळी असो. चे अध्यक्ष सुरेश जाधव, सचिव श्रीनिवास बोज्जा, उपाध्यक्ष गजेंद्र राशीनकर, गणेश परभणे, सहसचिव अरविंद साठे, देविदास ढवळे, उमेश क्षीरसागर, उबेद शेख आदी उपस्थित होते.
येत्या दिनांक 22 जानेवारी ला संपूर्ण भारतात व भारताबाहेर अयोध्या येथील श्री राममंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा साजरा होणार आहे. सदर सोहळा दिवाळी सारखे साजरा करावे असे आवाहन करण्यात आहे.
त्या निमित्त अहमदनगर शहर व जिल्ह्या मध्ये ही नागरिकांना हा सोहळा साजरा करता यावा या हेतूने दि अहमदनगर फटाका व्यापारी असो चे वतीने मा. निवासी जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षक साहेब यांना निवेदन फटाका विक्री करणेसाठी परवानगी मागितली असता दोन्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी परवानगी देण्यास हरकत नाही असे सांगितले व लवकरच परवानगी देऊ असे आश्वासन दिले.
या वेळी असो चे अध्यक्ष सुरेश जाधव यांनी अहमदनगर जिल्ह्यातील फटाका व्यापाऱ्यांनी आपआपल्या तालुक्यात गावात परवानगी घेऊन फटाका विक्री करून या सोहळ्यात सहभागी होण्याचे आवाहन केले.
तर असो चे सचिव श्रीनिवास बोज्जा यांनी अहमदनगर जिल्ह्यातील सर्व नागरिकांना आवाहन केले की, हा सोहळा सर्व नागरिकांनी दिवाळी सारखा फटाके उडवून साजरा करावा असे आवाहन केले या वेळी असो चे उपाध्यक्ष गजेंद्र राशीनकर यांनी सर्वांना सोहळ्या निमित्त शुभेच्छा दिले व प्रशासनाचे आभार मानले.