
मागील तीन दिवसांपासून पुण्यात पावसाच्या हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या सरी कोसळत आहे. ऐन दिवाळीत पाऊस पडल्यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली.
अवेळी पडलेल्या पावसामुळे वातावरण बदलले. हवेत गारवा निर्माण झाला. मुंबई आणि आसपासच्या परिसरात परवा पाऊस पडला.
मराठवाड्यातही मागील तीन दिवसांत ठिकठिकाणी अवेळी हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या सरी कोसळल्या. रत्नागिरीमध्येही अवकाळी पावसाने हजेरी लावल्यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली.