ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

आरोग्य व शिक्षणब्रेकिंगमहाराष्ट्र

सन 2023-24 या शैक्षणिक वर्षा करिता शाळांना द्यावयाच्या शालेय सुट्यांचे नियोजन जाहीर

बुलडाणा

सामान्य प्रशासन विभाग, महाराष्ट्र शासन यांचे राजपत्र दि.02 डिसेंबर 2022 अन्वये सन 2023-24 या शैक्षणिक सत्रा मध्ये बुलडाणा जिल्हयातील सर्व (सर्व माध्यम सर्व व्यवस्थापन) प्राथमिक शाळांना खालीलप्रमाणे शैक्षणिक वार्षिक सुट्टयांचे नियोजन तयार करण्यात आलेले आहे.

सदर सुट्या हया जिल्हयातील सर्व व्यवस्थापनाच्या सर्व माध्यमांच्या सर्व प्राथमिक शाळांना लागू राहतील.

सन 2023-24 मध्ये एकुण शालेय कामकाजाचे दिवस व एकुण सुट्टयांचे दिवस यांचा तपशिल यासोबतच्या जोडपत्र- अ व ब नुसार देण्यात आला आहे.

प्रजासत्ताक दिन २६ जानेवारी (गुरुवार) ,महाशिवरात्री १८ फेब्रुवारी (शनिवार) ,छत्रपती शिवाजी महाराज जयंती १९ फेब्रुवारी (रविवार) ,होळी (दुसरा दिवस) ७ मार्च (मंगळवार) ,गुढीपाडवा २२ मार्च (बुधवार) ,रामनवमी ३० मार्च (गुरुवार) ,महावीर जयंती ४ एप्रिल (मंगळवार),गुड फ्रायडे ७ एप्रिल (शुक्रवार) ,डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती १४ एप्रिल (शुक्रवार)

शालेय सुट्टी वेळापत्रक 2023 – 2024

महाराष्ट्र दिन १ मे (सोमवार) ,बुद्ध पौर्णिमा ५ मे (शुक्रवार) ,बकरी ईद (ईद उल झुआ)२८ जून (बुधवार) ,मोहरम २९ जुलै (शनिवार) ,स्वातंत्र्य दिन १५ ऑगस्ट (मंगळवार) , पारशी नववर्ष दिन (शहेनशाही) १६ ऑगस्ट (बुधवार),गणेश चतुर्थी १९ सप्टेंबर (मंगळवार), ईद-ए-मिलाद २८ सप्टेंबर (गुरुवार), महात्मा गांधी जयंती २ ऑक्टोबर (सोमवार),दसरा २४ ऑक्टोबर (मंगळवार), दिवाळी अमावस्या (लक्ष्मीपूजन) १२ नोव्हेंबर (रविवार),दिवाळी (बलिप्रतिपदा) १४ नोव्हेंबर (मंगळवार),गुरुनानक जयंती २७ नोव्हेंबर (सोमवार) ,ख्रिसमस २५ डिसेंबर सोमवारी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

प्रथम सत्र दि. 30 जून ते 9 नोव्हेंबर 2023 राहील.दिपावली सुटी दि. 10 ते 25 नोव्हेंबर 2023 या कालावधीत राहील.

दिवाळी सुट्टी दि. 10 से 25 नोव्हेंबर 2023 असून दि. 28 नोव्हे 2023 रोजी व्दितीय सत्र नियमित सुरु होईल.

व्दितीय सत्र 28.11.2023 ते 01.05.2024 या कालावधीत राहिल.उन्हाळी सुटी दि.02 में से 29 जुन 20024 दि. 30 जुन 20024 रोजी शाळा नियमित सुरु होतील.

मा. जिल्हाधिकारी यांच्या अधिकारातील सुटया, मराठी वर्ष तिथीमधील बदल, किंवा शासन निर्देश यानुसार बदल झाल्यास, सुधारीत सूचना जारी करण्यात येतील.

रविवारी येणा-या सुट्टया –

दिनांक 14.04.20124(रविवार) – भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती

दिनांक 21.04.2024(रविवार) – भगवान महावीर जयंती

मुख्याध्यापक अधिकारातील सुट्टया

मुख्याध्यापक अधिकारातील दोन (2) सुट्टया सन-2023-24हया स्थानिक स्तरावरील यात्रा / उसे सुट्टया याकरिता मुख्याध्यापकांनी शाळास्तरावर घ्यावयाच्या आहेत.

मुख्याध्यापकांनी या गटशिक्षणाधिकारी यांचेकडुन मंजुर करुन घ्याव्यात.

सन 2024 च्या शासन परिपत्रकातील खुटीप्रमाणे रमजान ईद’ची सुटी राहील..

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे