ब्रेकिंगमहाराष्ट्र
पंढरपुरात भाविकांची मांदियाळी,१ लाख भाविकांनी घेतले विठुरायाचे मुख दर्शन
कार्तिकी सोहळ्यासाठी राज्यभरातून सुमारे पाच लाखांहून अधिक भाविक पंढरपुरात दाखल

कार्तिकी एकादशीनिमित्ताने पंढरपुरात भाविकांची मांदियाळी पाहण्यास मिळाली. पंढरपुरात दाखल भाविकांनी कार्तिकी एकादशी आणि आजच्या द्वादशीला दुपारपर्यंत सुमारे एक लाख ७ हजार भाविकांनी विठुरायाचे मुख दर्शन घेतले. तर ५२ हजार भाविकांनी पदस्पर्श दर्शन घेतले.
कार्तिकी एकादशीच्या दिवशी पंढरपुरात भक्तीचा महापूर आला होता. यंदाच्या कार्तिकी सोहळ्यासाठी राज्यभरातून सुमारे पाच लाखांहून अधिक भाविक पंढरपुरात दाखल झाले होते. शासकीय महापूजे दरम्यान मुखदर्शन सुरू ठेवण्यात आले होते. सुमारे एक लाख सात हजार भाविकांनी मुख दर्शन घेतले.
सरासरी एक मिनिटामध्ये ३५ भाविकांनी देवाचे पदस्पर्श दर्शन घेतले. वारी काळात भाविकांची संख्या मोजणीसाठी काऊंटींग सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत.