
पुण्यात दिवाळीच्या खरेदीसाठी लक्ष्मी रस्ता, मंडई परिसरात झुंबड उडाली. गर्दीमुळे बाजीराव रस्ता, शनिपार, मंडई, तसेच शिवाजी रस्ता परिसरातील वाहतूक विस्कळीत झाली होती. खरेदीसाठी अनेक जण मोटारीतून आले होते.
खरेदीसाठी गर्दी झाल्याने मध्य भागातील गल्ली-बोळातील वाहतूक विस्कळीत झाली होती.
मंडई, शनिपार परिसरात उटणे, आकाशकंदील, पूजा साहित्य खरेदीसाठी गर्दी झाली होती. बुधवार पेठेतील पासोड्या मंदिराजवळील विद्युत साहित्य विक्री करणारी दुकाने रोषणाईने उजळली होती. अनेक जण सहकुटुंब मध्य भागात खरेदीसाठी आले होते.
बाजीराव रस्ता, मंडई, शनिपार, शिवाजी रस्त्यावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. नागरिकांची किती गर्दी आहे. लोकांना व्यवस्थित चालायलाही जमत नाहीये एवढी गर्दी दिसत आहे.