
राज्यात ढगाळ हवामानामुळे कमाल तापमानात चढ-उतार होत आहेत. हवामान विभागाने आज कोकणात उष्ण व दमट हवामानाचा, तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात वादळी वारे, विजांसह पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
विदर्भात तुरळक ठिकाणी गारपीटीची शक्यताही हवामान खात्याने वर्तवली आहे.