ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

SBC प्रवर्गातील सर्व समाविष्ट जातींनी एकत्र यावे- राज्य अध्यक्ष सुरेश पदमशाली

अहिल्यानगर मध्ये SBC अन्याय निवारण कृती समितिची बैठक संपन्न..

SBC अन्याय निवारण कृती समितीची बैठक अहिल्यानगर येथे पार पडली या बैठकीचे अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष सुरेश पद्मशाली व जनरल सेक्रेटरी जितेंद्र कांचानी हे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते यावेळी महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष श्रीनिवास बोज्जा, मा अण्णा हजारे यांचे भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलनाचे उपाध्यक्ष अशोक सब्बन, स्वकुलसाळी समाजाचे कार्यकर्ते दिलीप घुले तसेच पद्मशाली समाजातील भीमराज कोडम रवी दंडी व इतर अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी बोलताना राज्य अध्यक्ष सुरेश पद्मशाली म्हणाले मी गेले 35 वर्षापासून एसबीसी आंदोलन ही चळवळ उभी केली आहे, मुंबई मंत्रालयासमोर अनेक वेळा अमरण उपोषण केले, अनेक केसेस हायकोर्टामध्ये दाखल केले परंतु अजून पर्यंत न्याय मिळाला नाही यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून एसबीसी प्रवर्गामध्ये ज्या ज्या जाती आहेत त्या त्या जातीचे प्रमुख वक्ते एकत्र येऊन मोठे आंदोलन करणे ही काळाची गरज आहे यासाठी अहिल्यानगर मध्ये सुद्धा बेमुदत उपोषण करावे लागेल यासाठी सर्व समाज बांधवांनी एकत्र यावे असे आवाहन केले.

यावेळी राज्य जनरल सेक्रेटरी जितेंद्र कांचानी यांनी एसबीसी आरक्षण स्वतंत्र का मिळावे याबाबत विस्तृतपणे माहिती दिली व या लढ्यासाठी सर्व जातीतील घटकांनी एकत्र यावे असे आवाहन केले ..

यावेळी भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलनाचे अशोक सब्बन म्हणाले कोणतीही मागणी पूर्ण करायची असेल तर त्यासाठी आंदोलनाशिवाय पर्याय नाही एसबीसी राखीव आरक्षण दिलेले असताना त्याची अंमलबजावणी प्रशासन का करत नाही याचाच अर्थ एसबीसी धारक याकरिता आजपर्यंत जागृत नाहीत यासाठी आपल्याला सर्व एसबीसी धारकांना जागृत करणे काळाची गरज असून यापुढे प्रशासनाला जाग आणायची असेल व आपल्या मागण्या पूर्ण करायचे असेल तर मोठे जन आंदोलन महाराष्ट्र राज्यात उभे करावे लागेल असे म्हणाले.. यावेळी राज्य उपाध्यक्ष श्रीनिवास बोज्जा म्हणाले एसबीसी चळवळ ची ठिणगी पुण्यातून सुरू झाली असून आता ही चळवळ संपूर्ण महाराष्ट्र राज्यात नेणे गरजेचे आहे जोपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रातील एसबीसी प्रवर्गातील घटक एकत्र येणार नाही तोपर्यंत एसबीसी आरक्षणाची अंमलबजावणी होणार नाही व आपल्या मागण्या पूर्ण होणार नाही यासाठी अहिल्यानगर मधील सर्व एसबीसी प्रवर्गातील जातींनी एकत्र यावे असे आवाहन केले.

यावेळी बैठकीत स्वकुळसाळी समाजाचे दिलीप घुले, भीमराज कोडम रवी दंडी,ऋषिकेश गुंडला, तिरमलेश पासकंटी व ऍड. राजू गाली असे अनेकांनी आपले मनोगत व्यक्त केले.

सुरुवातीला अहिल्या नगर च्या वतीने राज्य अध्यक्ष सुरेश पदमशाली यांचा सन्मान श्रीनिवास बोज्जा यांनी केले तर जनरल सेक्रेटरी जितेंद्र कांचानी यांचा सन्मान अशोक सब्बन यांनी केले.

यावेळी बैठकीसाठी दिलीप आडगटला, सौ सुरेखा आडम मॅडम, विनोद बोगा,पत्रकार सागर सब्बन, आकाशवाणीचे राजेंद्र दासरी, लक्ष्मण गुरप, अमित बिल्ला, गंगा दत्तात्रय सचिन बत्तीन, रितेश मेरगु, अभिजीत सापा, जयकुमार भैरी, रवी बुरा, गणेश भाऊ मारवाडे, अभिषेक मारवाडी व विलास दिकोंडा आदी उपस्थित होते.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे