
येथील तालुका दंडाधिकारी तथा तहसील कार्यालयातील महसूल सहाय्यक अंकुश होले या कर्मचाऱ्यांचे आज, बुधवार, ३ एप्रिलला दुपारी दीड वाजताच्या सुमारास निधन झाले. ऐन ३४ वर्षाच्या वयात हृदय विकाराचा तीव्र धक्का लागल्याने अंकुशला जीव गमवावा लागला. या मृत्यूमुळे पंचक्रोशीत हळहळ व्यक्त होत असून होले कुटुंबासह महसूल विभागातून तीव्र शोक व्यक्त केला गेला.