ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्रसामाजिक

चंदूकाका सराफ अहिल्यानगर शाखेच्या वतीने पद्मशाली स्नेहींता संघम च्या महिलांच्या हस्ते चांदीच्या नवीन दालनाचे उदघाटन उत्साहात संपन्न

अहिल्यानगर

चंदूकाका सराफ अहिल्यानगर शाखेच्या वतीने महिलांसाठी श्रावण सखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले.. त्यासाठी समाज उपयोगी विविध उपक्रम राबविणाऱ्या पद्मशाली स्नेहिता संघम च्या सर्व महिलांना निमंंत्रित करण्यात आले.

श्रावण मास चालू आहे त्यानिमित्ताने चंदूकाका सराफ यांच्या चांदीच्या दागिन्यांचे नवीनच स्कीम (सिल्वर स्टोरी ) याचेही याप्रसंगी स्नेहितासंगमच्या महिलांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.

याप्रसंगी महिलांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले.. त्यानंतर चांदीच्या दागिन्यांच्या दालनाचे उद्घाटन संपन्न झाले..

शाखा व्यवस्थापक नागेश्वरी माळी या उपस्थित होत्या..प्रास्ताविक पोर्णिमा पवार यांनी केले श्री गणेश निकम यांनी चंदूकाका सराफ या आलिशान दा ल नाचा इतिहास , निरनिराळ्या शाखा ,परंपरिक दागिने याची माहिती दिली..त्यांचे सामाजिक उपक्रम विषयी माहिती दिली …. सुरेखा कळंके यांनी सुवर्न्आरंभ व गोल्डन सिल्वर प्लस या योजनेची माहिती दिली…..

पद्मशाली स्नेहिता संघमच्या अध्यक्षा डॉक्टर रत्ना बल्लाळ यांनी चंदूकाका सराफ च्या सर्व उपक्रमांचे कौतुक केले..  आम्हा महिलांना सिल्वर स्टोरी या दालानाचे उद्घाटनाची संधी दिली याबद्दल आभार मानले..

याप्रसंगी सपना छिंदम रेखा वड्डेपल्ली कविता भारताल यांनी मनोगत व्यक्त केले. उपस्थित सर्व महिलांचा शाल व रोप देऊन सत्कार सत्कार करण्यात आला..

श्रावणातील मंगळागौर चे निरनिराळे खेळ झिम्मा फुगडी फेर धरणे इत्यादी खेळ खेलले सर्व महिलांनी मनसोक्त खेळून श्रावण सोहळ्याचा भरपूर आनंद लुटला.. तेथील सर्व महिला कर्मचारी यांनीही खेळात सहभाग घेतला… शेवटी सर्व महिलांना अल्पोपहार देण्यात आला..

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे