ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

राज्यातील सर्व शाळांची माहिती अद्ययावत करण्यासंबंधी शासनाचे महत्त्वपूर्ण परिपत्रक जाहीर

अहिल्यानगर

शिक्षक भारती संघटनेच्या पाठपुराव्याला यश – राज्यातील सर्व शाळांची माहिती अद्ययावत करण्यासंबंधी शासनाचा महत्त्वपूर्ण परिपत्रक जाहीर -सुनील गाडगे.

राज्यातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमध्ये यु-डायस (ण-ऊखडए) प्रणालीअंतर्गत सर्व शाळा, विद्यार्थी व शिक्षकांची माहिती दिनांक 30 सप्टेंबर 2025 पर्यंत अद्ययावत करण्याबाबत महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई यांच्याकडून महत्त्वपूर्ण मार्गदर्शक परिपत्रक निर्गमित करण्यात आले आहे.

या परिपत्रकामुळे शैक्षणिक व्यवस्थापन अधिक सुसूत्र व पारदर्शक होणार असून, त्यामागे शिक्षक भारती संघटनेचा सातत्यपूर्ण पाठपुरावा व अभ्यासपूर्ण निवेदनं कारणीभूत ठरली आहेत. असे शिक्षक नेते तथा शिक्षक भारतीचे राज्य सचिव सुनील गाडगे यांनी सांगितले.

शिक्षक भारती संघटनेने गेल्या अनेक महिन्यांपासून यु-डायस प्रणालीतील त्रुटी, शिक्षक-विद्यार्थी माहितीतील विसंगती, तसेच शाळांच्या मूलभूत सुविधांची अद्ययावत नोंदणी याबाबत वेळोवेळी शासनाकडे लक्ष वेधले होते.

संघटनेच्या शिष्टमंडळाने शिक्षण आयुक्त, राज्य प्रकल्प संचालक आणि संबंधित प्रशासकीय अधिकार्यांची भेट घेऊन यासंदर्भात ठोस मागण्या मांडल्या होत्या.

यु-डायस प्रणालीमध्ये 30 सप्टेंबर 2025 पर्यंत सर्व शाळा, विद्यार्थी व शिक्षकांची माहिती अद्ययावत करणे अनिवार्य.,शिक्षकांच्या शैक्षणिक पात्रता, प्रशिक्षण, नियुक्ती दिनांक, विषय इत्यादी माहिती सुद्धा अचूक भरली जाणार.,विद्यार्थी आधार कार्ड लिंकिंग, अपार नोंदणी, ड्रॉपबॉक्समधील विद्यार्थ्यांची नोंद, विशेष घटक विद्यार्थी (जसे की दिव्यांग, आरटीई इ.) यांची माहिती तातडीने अपलोड करणे आवश्यक, या निर्णयामुळे राज्यातील शिक्षण व्यवस्थेची गुणवत्ता सुधारेल, शैक्षणिक नियोजन सुसूत्र होईल, व सर्व शासकीय योजना विद्यार्थ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचू शकतील. शिक्षक भारती संघटनेचे राज्य, विभागीय आणि जिल्हा पदाधिकारी यांचे यासाठी मोलाचे योगदान असून, त्यांची भुमिका शिक्षण क्षेत्रात नेहमीच मार्गदर्शक ठरली आहे.

शिक्षक भारती संघटनेचे आमदार कपिल पाटील राज्य अध्यक्ष अशोक बेलसरे कार्याध्यक्ष सुभाष मोरे सचिव सुनील गाडगे जिल्हाध्यक्ष तथा माध्यमिक शिक्षक सोसायटीचे संचालक आप्पासाहेब जगताप, जिल्हा सचिव विजय कराळे, सोमनाथ बोंतले जिल्हा महिला अध्यक्ष आशा मगर कार्यवाह संजय भुसारी, कैलास जाधव, योगेश हराळे, नवनाथ घोरपडे, सचिन शेलार, गोरक्षनाथ गव्हाणे. उर्दू जिल्हाध्यक्ष मोहंमद समी शेख, , उच्च माध्यमिक जिल्हाध्यक्ष रामराव काळे पुणे विभागीय कार्याध्यक्ष तथा शिक्षक भरतीचे जिल्हा सचिव महेश पाडेकर संभाजी पवार हनुमंत रायकर, सिकंदर शेख, संजय पवार, संतोष देशमुख, किसन सोनवने, संतोष शेंदुरकर, संभाजी चौधरी , श्रीकांत गाडगे, रेवण घंगाळे, जॉन सोनवणे, महिला जिल्हाध्यक्ष आशा मगर, सचिव विभावरी रोकडे, कार्याध्यक्ष मीनाक्षी सूर्यवंशी, रोहिणी भोर, शकुंतला वाळुज, छाया लष्करे, जया गागरे, अनघा सासवडकर, रूपाली बोरुडे. सोनाली अकोलकर, विनाअनुदानितच्या राज्यअध्यक्षा रूपाली कुरूमकर आदी प्रयत्नशिल होते.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे