ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

अहिल्यानगर मध्ये मॅगीमध्ये आढळली मृत पाल..अन्न व औषध प्रशासनाकडे तक्रार

अहिल्यानगर

शहराच्या बोल्हेगाव उपनगरातील रहिवासी नीलेश दादासाहेब दिवे (रा. गांधीनगर) यांनी, सावेडी उपनगरातील मॉलमधून खरेदी केलेल्या मॅगीच्या पाकिटामध्ये मृत पालीचे पिल्लू आढळले.

यासंदर्भात त्यांनी उत्पादक कंपनी व मॉलवर कारवाई करावी, अशा मागणीचा तक्रार अर्ज अन्न व औषध प्रशासन विभागाकडे आज, बुधवारी दाखल केला आहे. अन्न सुरक्षा अधिकारी राजेश बडे यांनी तक्रार प्राप्त झाल्याचे सांगितले.

अधिक माहिती देताना नीलेश दिवे यांनी सांगितले की, सावेडी उपनगरातील ‘डी मार्ट’ या मॉलमधून २ जुलैला पाचशे ग्रॅम वजनाची दोन मॅगीची पाकिटे खरेदी केली. दहा दिवसांपूर्वी त्यातील एका पाकिटाचा वापर केला. त्यानंतर सोमवारी (दि. २८) दुसरे पाकीट फोडले असता त्यातील मॅगीमध्ये पालीचे मृत पिल्लू आढळून आले.

नीलेश दिवे यांनी सांगितले की, आपण संबंधित नेस्ले कंपनी व डी मार्ट या दोघांनाही ई-मेल पाठवून तक्रार नोंदवली आहे तसेच अन्न व औषध प्रशासनाच्या कार्यालयात तक्रार दिली आहे. अन्न सुरक्षा अधिकारी राजेश बडे यांनी सांगितले की नेस्ले कंपनी व डी मार्ट मॉल हे दोघेही केंद्रीय ‘फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड ऑफ इंडिया’ या केंद्रीय कायद्यान्वये परवानाधारक असल्याने केंद्रीय विभागास माहिती कळवली जाणार आहे तसेच येथील वितरकांना या बॅचचे उत्पादन विक्री करू नये असे कळवले जाईल.

तक्रारीचा ई-मेल नेस्ले उत्पादक कंपनी व डी मार्ट मॉलला पाठवल्यानंतर दोघांनीही पैसे परत करू, असे सांगितले. परंतु आपल्याला पैसे नको आहेत, कारण मॅगी लहान मुले खातात, त्यामुळे संबंधितावर कारवाई व्हावी, अशी आपली मागणी आहे. – नीलेश दिवे, तक्रारदार

उत्पादक नेस्ले कंपनी व विक्री करणारे डी मार्ट मॉल हे दोन्हीही केंद्रीय परवाना प्राधिकरणकडून परवाना मिळवलेले आहेत. त्यामुळे नीलेश दिवे यांची तक्रार संबंधित विभागाकडे पाठवली जाईल. -राजेश बडे, अन्न सुरक्षा अधिकारी, अहिल्यानगर

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे