
येथील पद्मशाली समाज सेवानिवृत्त संघाचे तिसरे वर्धापन दिन पद्मशाली ज्ञाती संस्थेचे विश्वस्त मुरलीधर आरकाल यांचे अध्यक्षते खाली सोलापूर यंत्रमाग धारक संघाचे अध्यक्ष पेंटप्पा गड्डम यांचे हस्ते आणि सेवानिवृत्त संघाचे अध्यक्ष श्रीहरी कुरापाटी,उपाध्यक्ष अनिल कन्ना, सचिव यशवंत इंदापुरे ,सहसचिव सत्यनारायण बरदेपूर यांचे प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले.
प्रथम सर्व मान्यवरांचे हस्ते श्री मार्कंडेय महामूनी प्रतिमेचे पुजन करून पुष्पहार अर्पण करण्यांत आले. सर्व पाहुण्यांचे स्वागत उपाध्यक्ष अनिल कन्ना यांनी केले व प्रास्ताविक भाषणांत संघाचे कार्याची माहिती दिली. यानंतर प्रमुख पाहुण्यांचे बुके देऊन सत्कार करण्यांत आले. पेंटप्पा गड्डम यांनी मार्गदर्शन भाषणांत सेवानिवृत्त संघाचे कौतुक करत सर्वाना दिर्यायुष्य लाभावे आणि असेच समाज कार्यास आपले अनुभवाचा फायदा समाज मिळावा असे सांगत संघास वर्धापन दिनाच्या शुभेच्छा दिल्या. भारती सग्गम यांनी मनोगत व्यक्त केले. अध्यक्षीय भाषणांत मुरलीधर आरकाल यांनी संघाचे कामकाज पाहून समाधान व्यक्त केले तसेच सर्वाना उत्तम आरोग्य लाभो अशी श्री मार्कंडेय चरणी प्रार्थना केली आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.या कार्यक्रमांस अंबादास इंदापुरे, रमेश अलवाल, अविनाश संगा, अशोक पासकंटी, विवेकानंद श्रीपती, सोमय्या यनगंदूल, दत्तात्रय बोलाबत्तीन, सत्यनारायण पोटाबत्ती, अनिल जन्यारम, सदानंद बोडा, राजेंद्र गालपल्ली,भारती सग्गम, गितांजली श्रीराम, प्रमिला वडीशेरला ,सुरेखा गोली, यशोदा गोटीपामूल, अनुराधा पोटाबत्ती ममता बोलाबत्तीन आदी मान्यवर उपस्थित होते.
सदर कार्यक्रम यशस्वी होणेसाठी खजिनदार नागनाथ गज्जम, श्रीनिवास बोल्लाबत्तीन, अरूणा कन्ना, श्रीनिवास वल्लाकाटी,नागनाथ बोड्डू, बाबू गंधमल,किसन आडम , दशरथ इंदापुरे ,अंबादास कंची आदींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन अनिल कन्ना यांनी मांडले तर आभार सचिव यशवंत इंदापुरे यांनी मांडले.