ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्रसामाजिक

गांधी मैदानच्या श्री मार्कंडेय विद्यालयात भरली विठ्ठल नामाची शाळा..

अहिल्यानगर

बाल वारकऱ्यांची दिंडी उत्साहात ..उत्साहत रंगळा रिंगण सोहळा..

शहरातील गांधी मैदान येथील श्री मार्कंडेय माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय येथे आषाढी एकादशी निमित्त बाल वारकऱ्यांचा दिंडी सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी दिंडीचा मुख्य आकर्षण ठरलेला रिंगण सोहळा पार पडला.

दिंडीत विठ्ठल-रुक्मिणी, ज्ञानेश्‍वर माऊली, संत तुकाराम, मुक्ताबाई यांच्या वेशभूषेत असलेल्या विद्यार्थ्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. टाळ मृदुंगाच्या गजरात, विठू नामाच्या जयघोषात, पारंपारिक वारकऱ्यांच्या वेशभूषेत, हातात भगवे ध्वज घेतलेले विद्यार्थी उस्फूर्तपणे दिंडीत सहभागी झाले होते.

इयत्ता 5 वी ते 7 वीच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेले विठ्ठलाचे गीताने वातावरण प्रसन्न बनले होते. तर मथुरा आढाव यांनी गायलेले अभंग, संत जनाबाई यांची गवळण आणि सौ. म्याना यांनी गायलेले भक्तीगीताने परिसर भक्तीमय झाले होते. कार्यक्रमास पद्मशाली विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष बाळकृष्ण सिद्दम, विद्यालयाचे मुख्याध्यापक संदिप छिंदम, उपमुख्याध्यापक पांडुरंग गोने, पर्यवेक्षक प्रमोद चन्ना, शिक्षक प्रतिनिधी अर्चना साळुंके, प्रा. बत्तीन पोटयान्ना प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक श्रीनिवास मुत्त्याल आदींसह पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जयश्री मेहेर यांनी केले. आषाढी एकादशीनिमित्त कविता गुडेवार यांनी उत्कृष्ट असे फलक लेखन केले. दिंडीचे उत्कृष्ट नियोजन रेणूका खरदास यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शालेय शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

 

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे