ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र

अहिल्यानगर मध्ये आणखी एका मल्टिस्टेटच्या शाखांवर छापे , महत्वाची कागदपत्रे, संगणक जप्त

अहिल्यानगर

ध्येय मल्टिस्टेटच्या सुमारे सात कोटी 60 लाख रूपयांच्या अपहार प्रकरणी दाखल गुन्ह्यात तोफखाना पोलिसांनी मल्टिस्टेटच्या श्रीगोंदा तालुक्यातील लोणी व्यंकनाथ, कोळगाव, काष्टी, बेलवंडी व अहिल्यानगर तालुक्यातील सारोळा कासार या शाखेत बुधवारी छापेमारी करून महत्वाचे कागदपत्रे, संगणक तपासकामी जप्त केले आहेत.

पोलीस निरीक्षक आनंद कोकरे यांच्या मार्गदर्शनखाली पोलीस उपनिरीक्षक शैलेश पाटील यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे. दरम्यान, यापूर्वी कर्जत, राशीन, कुळधरण, बिटकेवाडी या शाखेत छापेमारी करून महत्वाचे कागदपत्रे, संगणक तपासकामी जप्त केले होते.ध्येय मल्टिस्टेट निधी लिमीटेड पतसंस्थेने जादा परतावा देण्याचे आमिष दाखवून व नंतर कोणत्याही प्रकारचा परतावा न देता पतसंस्था बंद करून ठेवीदारांच्या पैशांचा अपहार केल्याप्रकरणी ठेवीदार सुजाता संदीप नेवसे (रा. शिंदे मळा, सावेडी) यांच्या फिर्यादीवरून तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाल्यापासून सर्व संशयित पसार झाले आहेत. त्यातील व्हा. चेअरमन रोहिदास कवडे याला तोफखाना पोलिसांनी फेब्रुवारी महिन्यात अटक केली होती. दोघांना न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. उर्वरीत संशयित आरोपींचा शोध सुरू आहे.

दरम्यान, या गुन्ह्याचे फॉरेन्सिक ऑडिट करण्याचा निर्णय पोलिसांनी घेतला आहे. त्यासाठी एका संस्थेची नेमणुक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून ऑडिट सुरू आहे.

तपासकामी मल्टिस्टेटच्या विविध शाखेमधील महत्वाचे कागदपत्रे पोलिसांकडून जप्त करण्यात येत आहे. यापूर्वी कर्जत, राशीन, कुळधरण, बिटकेवाडी या शाखेत छापेमारी करून महत्वाचे कागदपत्रे जप्त करण्यात आली होती.

तसेच बुधवारी (18 जून) निरीक्षक कोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक पाटील यांच्या पथकाने श्रीगोंदा तालुक्यातील लोणी व्यंकनाथ, कोळगाव, काष्टी, बेलवंडी व अहिल्यानगर तालुक्यातील सारोळा कासार या शाखेत छापे टाकले.

तेथील कॅशबुक, ठेव पावती पुस्तके, अकाउंट रजिस्टर, आवक- जावक रजिस्टर, कर्मचारी हजेरी रजिस्टर, संगणक तपासकामी जप्त केले आहेत. ध्येय मल्टिस्टेटमध्ये सुमारे 184 ठेवीदारांचे सुमारे सात कोटी 60 लाख रूपये अडकले असल्याचे समोर आले आहे. यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.

 

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे