ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

स्नेहालय संस्थेच्या सुरुवातीच्या प्रवासापासून जनसंपर्क व निधी संकलन विभागात अतिशय प्रामाणिकपणे व उत्साहाने कार्य करणाऱ्या मा.रत्ना शिंदे मॅडम यांना AR News लेडीज स्पेशल चॅनेल यांच्या सौजन्याने मातृदिवस निमित्त आयोजित कर्तृत्ववान आई सन्मानाने सन्मानित करण्यात आले आहे..

अहिल्यानगर

मी स्नेहालय संस्थेत 2001 पासून काम करते. डॉ. गिरीश महादेव कुलकर्णी यांचे घर जुना मंगळवार बाजार, होशिंग हॉस्पिटल समोर. बिल्वदल अहिल्यानगर.

मी सरांच्या घरापासून कामाला सुरुवात केली. कामाचे स्वरूप जसे, की पत्र लिखाण सरांनी सांगितलेले प्रेस नोट सर्व संपादकांना सायकलवर वाटून येणे, व रेड लाईट लालबत्ती भागातील महिलांना भेटणे त्यांना कंडोम वाटणे सिव्हिल हॉस्पिटल मधून कंडोम घेऊन येणे अशी माझी सुरुवातीला कामाची सुरुवात झाली.

स्नेहालय ही संस्था एचआयव्ही एड्स बाधित मुलं मुली महिला यासंदर्भात विशेष काळजी घेण्याचे तसेच दुर्बल वंचित घटकासाठी काम करते.

त्यानंतर मी स्नेहालय एमआयडीसी पुनर्वसन संकुल येथे किचन विभागाला किचन सुपरवायझर मुलींच्या वस्तीगृह मध्ये काळजीवाहक काम तीन वर्ष केले. तसेच मुला मुलीं आरोग्य संदर्भ आरोग्य अधिकारी म्हणून तीन वर्ष काम केले त्यानंतर स्नेहाधार प्रकल्प येथे काम करायला लागले. तेथे मुख्यत्वे परितक्ता, अत्याचारीत पीडित, विधवा, वंचित, बलात्कारी, कौटुंबिक कलह, वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिला, कुमारी माता, अशा घटकांसोबत मी 17 वर्ष काम केले. पोलीस केस कोर्ट मिसिंग नवीन केस आली तर पोलिसात दाखल करणे खबर देणे. महिलांचे केस फाईल बनवणे कौन्सिलिंग करणे. समझोता करून कुटुंबात पाठवणे राज्यस्तरीय वधु वर मेळावा यामध्ये मुली लग्नाला उभ्या करून त्यांचे विवाह फॉर्म भरून घेणे सर्व कायदेशीर प्रोसेस करून गृहभेटी करणे व विवाह लावून देणे मी माझ्या हातून 250 मुलींचे लग्न लावून दिले.असा माझा सतरा वर्षाचा स्नेहा धार प्रकल्पात प्रवास झाला.

त्यानंतर प्रकल्प बदल म्हणून 2014 मध्ये मी स्नेहालय संचालित जनसंपर्क कार्यालय एमआयडीसी अहमदनगर येथे नव्याने काम चालू केले. संस्था भेटीस आलेल्या पाहुण्यांचे स्वागत करणे हितचिंतक परिचय फॉर्म ड्राईव्ह अपडेट करणे अपील कॉलिंग करणे वाढदिवसाचे पत्र पाठवणे व वाढदिवसाचे मेसेज करणे वाढदिवसाच्या फोन कॉल्स करणे; देणग्या मिळवणे, माणसं जोडणे, डोनेशन पावत्या करणे, वस्तुरूप डोनेशन पावत्या करणे, रिक्वायरमेंट नुसार डोनेशन मिळवणे, स्मरणार्थ भोजन, वाढदिवस निमित्त भोजन, सदिच्छा भोजन लग्न, वाढदिवस निमित्त स्नेहभोजन, असे सध्या माझे काम आहे. मी माझे काम खूप आनंदाने करते. मी माझ्या कामात खूप समाधानी आहे.

स्नेहालय संस्थेच्या सुरुवातीच्या प्रवासापासून आपल्यासोबत असलेल्या जनसंपर्क व निधी संकलन विभागात अतिशय प्रामाणिकपणे व उत्साहाने कार्य करणाऱ्या मा.रत्ना शिंदे मॅडम यांना आज AR News लेडीज स्पेशल चॅनेल यांच्या सौजन्याने मातृदिवस निमित्त आयोजित कर्तृत्ववान आई सन्मानाने सन्मानित करण्यात आले आहे.

स्नेहालय संस्थेच्या बालकांच्या आयुष्यात आई नावाची भूमिका निभावत त्या खरोखर सर्वांसाठी आदर्श माता आहेत. याचा आम्हाला अभिमान वाटतो. खूप खूप अभिनंदन रत्ना मॅडम…संपूर्ण स्नेहालय परिवाराकडून आपले मनःपूर्वक अभिनंदन…

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे