ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

विद्यार्थ्यांनी विज्ञानाची कास धरून संधीच सोन करावे – रंगनाथ बंकापुरे

सोलापूर

महाराष्ट्र राज्य पद्मशाली महिला संघम व महाराष्ट्र राज्य पद्मशाली इंजिनिअर्स विभाग संघम च्या वतीने अरिहंत इंग्लिश मेडी.स्कूल मध्ये इलेक्ट्राॅनिक्स , आओटी आणि रोबोटिक्स शिबीराचे समारोप कार्यक्रम महिला संघमचे अध्यक्षा संगीता इंदापुरे यांचे अध्यक्षतेखाली व प्रमुख पाहूणे म्हणून रंगनाथ बंकापुरे, डाॅ.अजय पोन्नम,तर प्रमुख उपस्थिती म्हणून महाराष्ट्र राज्य पद्मशाली संघमचे प्रधानसचिव यशवंत इंदापुरे, इंजिनिअर्स विभाग संघमचे अध्यक्ष वेणुगोपाल येमुल, सचिव व प्रशिक्षक प्रशांत गाजुल स्कूलचे पर्यवेक्षक तस्नीम शेख मॅडम , यांचे उपस्थितीत संपन्न झाले.

प्रथम सर्व मान्यवराचे हस्ते श्री सरस्वती पुजन करून पुष्पहार अर्पण करून व्दिप प्रज्वलन करण्यांत आले. तसेच नारळ वाढविण्यांत आले. त्यानंतर सर्व मान्यवरांचे डाॅ. अजय पोन्नम यांनी बुके देऊन स्वागत केलै. प्रस्ताविक भाषण प्रशांत गाजूल यांनी विद्यार्थ्यी खुपच अॅक्टीव असल्याचे सांगितले.प्रशिक्षणार्थी विदयार्थ्यांनी शिबीरात तयार केलेले प्रकल्प सादर करून सर्वांच्या टाळ्या मिळविल्या. यावेळी विद्यार्थ्यांनी मनोगते व्यक्त केले. वेणुगोपाळ येमूल यांनी मार्गदर्शन भाषणांत आता यापुढे तंत्रज्ञान आत्मसात करूनच राहिले पाहिजे ते आता बाहेर गांवी जाऊन शिकण्याची गरज नाही. आपल्या प्रशालेतच तंत्रज्ञानाच ज्ञान मिळणार आहे असे सांगितले. रंगनाथ बंकापुरे यांनी महाराष्ट्र राज्य पद्मशाली संघम व महा.राज्य पद्मशाली इंजिनिअर्स विभाग संघमचे कौतुक करून आधुनिक जगा बरोबर राहण्यासाठी आता पासूनच तंत्रज्ञान शिकले पाहिजे या संधीचे सोन केले पाहिजे असे सांगितले. तसेच विज्ञाना बरोबर संस्कृतीचे जतन करताना आई वडील, गुरूजनांचा मान ठेवले पाहिजे असे सांगितले. यशवंत इंदापुरे यांनी घरकूल मधील मुलीने रस्त्यावर झेब्रा क्राॅस केले असता किंवा हायवेवर शंभर पेक्षा जास्त स्पिडने गाडी चालविले असता, दंड भरावे लागेल याचा सशोधन करून पेन्टटं मिळविले ते संपुर्ण जगात वापरले जातेह असे आपणही शिकून देशासाठी संशोधन करावे आणि सोलापूरचे तसेच शाळेचे नांव उंचवावे असे सांगितले. शेवटी अध्यक्षीय भाषणांत संगीता इंदापुरे यांनी उन्हाळा सुट्टीचे सदउपयोग करावे आपल्या आवडी च्या क्षेत्रात एकाग्रतेने अभ्यास केल्यास यशस्वी व्हाल असे सुचविले.

या कार्यक्रमांस अनेक पालक, विदयार्थ्यी तसेच स्कूल मधील शिक्षक,शिक्षिका उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी होणे साठी महा.राज्य पद्मशाली महिला संघमच्या सचिवा सुलक्षणा पोन्नम यांनी परिश्रम घेतले तर सदर कार्यक्रमाचे आयोजन रजनी सग्गम यांनी केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन फौजन अजहारी यांनी केले तर आभार अंजली रगबले यांनी मांडले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे