ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

मनीषा लहारे यांना ‘आई पुरस्कार’ प्रदान, उल्लेखनीय सामाजिक कार्यासाठी गौरव

अहिल्यानगर

AR News च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या विशेष कार्यक्रमात उल्लेखनीय सामाजिक कार्यासाठी  मातृदिनानिमित्त आई सन्मान सोहळा पुरस्कार २०२५ प्रदान करण्यात आला.

हा सन्मान यतीराज बहुउद्देशीय सामाजिक प्रतिष्ठाणच्या राज्य सचिव आणि शिक्षिका मा. मनीषा लहारे यांना त्यांच्या सातत्यपूर्ण, निस्वार्थ सामाजिक योगदानाबद्दल बहाल करण्यात आला.

अहिल्यानगर येथील व्ही स्टार हॉटेल येथे पार पडलेल्या या सोहळ्यात पुरस्काराचे वितरण भाजप महिला अध्यक्ष मा.सौ. नम्रताताई गौड, महिला मंडळ शिक्षण संस्थेच्या संचालिका मा.सौ.मीनलताई गंधे, कस्तुरबा फाउंडेशनच्या संचालिका मा.सौ.वैशालीताई नराल, तसेच AR News चॅनलच्या संपादिका मा. श्रुतीताई बत्तीन यांच्या हस्ते करण्यात आले. पुरस्काराचे स्वरूप सन्मानचिन्ह व स्मृतीचिन्ह असे होते.

समाजातील वंचित, गरजू आणि उपेक्षित घटकांसाठी केलेल्या कार्याची दखल घेत AR News संस्थेने हा पुरस्कार जाहीर केला होता. मनीषा लहारे यांनी महिलांचे सक्षमीकरण, बालविकास, शिक्षण क्षेत्रातील योगदान तसेच सामाजिक जनजागृतीसाठी केलेले प्रयत्न उल्लेखनीय आहेत.

पुरस्कार स्वीकारताना मनीषा लहारे म्हणाल्या, “हा पुरस्कार केवळ माझा सन्मान नाही, तर माझ्या संस्थेच्या कार्यकर्त्यांच्या समर्पित सेवाभावाचेही मूल्यांकन आहे. हा सन्मान आम्हाला पुढील कार्यासाठी नवे बळ देतो.”

कार्यक्रमास विविध सामाजिक संस्था, शिक्षक, पत्रकार, आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी मनीषा लहारे यांचे अभिनंदन करत त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे