ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

शब्दशिल्प कलाविष्कार संघ साहित्य परिवार “मराठी दीपस्तंभ” पुरस्काराने सन्मानित

१ मे २०२५ रोजी अलिबाग येथे साहित्य संपदा तर्फे शब्दशिल्प कलाविष्कार संघ साहित्य परिवारास “मराठी दीपस्तंभ” पुरस्कार प्रदान करण्यात आला.

साहित्य संपदा या साहित्यिक परिवार/प्रकाशन संस्था यांनी साहित्य क्षेत्रातील उत्कृष्ट कार्य करून साहित्यिक घडवून अभिजात मराठी भाषेचा प्रचार व प्रसार करून साहित्यिक रुची निर्माण करण्यात बहुमोल योगदान देणाऱ्या साहित्यिक संस्थांना मराठी दिपस्तंभ पुरस्कार देऊन त्यांच्या कार्याचा गौरव केला.

त्यात शब्दशिल्प कलाविष्कार संघ साहित्य परिवाराचीही निवड झाली. या पुरस्कारासाठी शब्दशिल्प कलाविष्कार संघ साहित्य परिवाराचे आयोजक हिरकणी सौ. गीतांजली वाणी, कवी मयूर पालकर, सदस्य अश्विनी बोलके उपस्थित होते. त्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला.

व्यासपीठावर त्यावेळी मा. अनंत देवघरकर, मा. शेख सर, मा. सुनील चिटणीस, मा. रमेश धनावडे, मा. ऍड.विलास नाईक, साहित्यसंपदा संस्थापक मा. वैभव धनावडे अशी सर्व दिग्गज मंडळी उपस्थित होती.

मराठी राजभाषा दिनाचे औचित्यसाधून साहित्यसंपदा आयोजित राज्यस्तरीय साहित्य संमेलन अलिबाग येथे नुकतेच पार पडले.मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळालेला आहे.

मराठी भाषा प्रचार प्रसार ध्येय समोर ठेवून मराठी साहित्य कला आणि संस्कृती याचा संगम ह्या साहित्यिक संस्था कार्यातून दर्शवितात. मराठी दिपस्तंभ पुरस्कार मिळाल्याने आतापर्यंत केलेल्या कार्याचे सार्थक झाले आणि पुढील वाटचालीसाठी प्रोत्साहन व नवीन ऊर्जा मिळेल असा विश्वास पुरस्कार प्राप्त संस्था परिवाराकडे बघून दिसत होता.

शब्दशिल्प कला विष्कार संघ गेली चार वर्षे यशस्वी कार्यरत आहे. विविध साहित्यिक प्रकार ऑनलाईन विनामूल्य शिकवले जातात, उपक्रम आयोजन तथा स्पर्धा आयोजनातून ऑनलाईन सन्मानपत्र, कधी रोख बक्षिसे देखील देऊन प्रोत्साहन दिले जाते. संस्थेने दोन ऑफलाईन कार्यक्रम यशस्वी केले आहेत त्यात एक राज्यस्तरीय काव्यसहल जेथे संस्थेच्या द्वितीय वर्धापन दिनाचे औचित्य साधून प्रतिनिधिक काव्यसंग्रह नवरंगचे प्रकाशन अगदी पारंपरिक ग्रंथ दिंडी काढून झाले होते. काव्यसहलीत एकूण ऐशी सास्वत सहभागी झाले होते.

दुसरा ऑफलाईन कार्यक्रम राजमाता जिजाऊ काव्यसंमेलन आयोजन यशस्वी झाले. या सोहळ्यास एकूण १६५ सारस्वत सहभागी झाले होते. ऐशी कविता सादरीकरण आणि साहित्य क्षेत्रात उत्कृष्ठ कार्य करणाऱ्या ५० दिग्गज मंडळींना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले होते. संस्थेने विविध साहित्य प्रकार शिकवणाऱ्या ऑनलाईन ५० कार्यशाळा घेतल्या आहेत.

संस्थेचे भिन्न आयोजन यशस्वी करण्यासाठी समस्त आयोजक हिरकणी गीतांजली वाणी, चंदन तरवडे, सपना भामरे, मयूर पालकर, मिनल बधान, अर्चना नावरकर, प्रियंका कोठावदे मेहनत घेऊन नवनवीन संकल्पना राबवून सहभागी सारस्वतांना प्रोत्साहन देत असतात.
संस्थेला पुढील कार्यासाठी उपस्थित सर्व सारस्वतंकडून शुभेच्छा देण्यात आल्या.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे