ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

बारावी बोर्डाचा निकाल जाहीर,बारावीच्या निकालातही मुलींची बाजी

महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला. बारावीचे विद्यार्थी आणि पालक निकाल कधी लागणार याची वाट पाहत होते.

अखेर त्यांची प्रतीक्षा आज संपली. बारावीचा निकाल नुकताच बोर्डाकडून जाहीर करण्यात आला आहे. बारावी परीक्षेचा राज्याचा निकाल ९१.८८ टक्के लागला आहे.

दुपारी १ वाजता विद्यार्थ्यांना वेबसाईटवर जाऊन आपला निकाल पाहायला मिळणार आहे. त्याचसोबत निकालाची प्रत डाऊनलोड करून घेता येणार आहे. राज्य मंडळाचा हा निकाल ‘https://results.digilocker.gov.in’ आणि ‘https://mahahsscboard.in’ या वेबसाईटवर पाहता येणार आहे.

राज्य मंडळाने यंदा मे महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात बारावीचा निकाल जाहीर करत नवा विक्रम केला आहे. बोर्डाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी आज बारावीचा निकाल जाहीर केला. दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील कोकण विभागाने बाजी मारली आहे.

फेब्रुवारी २०२४ चा निकाल ९३.३७ टक्के होता. तर यावर्षी ९१.८८ टक्के निकाल लागला आहे. म्हणजेच गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षीचा निकाल १.४९ टक्क्यांनी कमी आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून बारावीची परीक्षा ११ फेब्रुवारी ते १८ मार्च २०२५ या कालावधीत घेण्यात आली होती. या परीक्षेसाठी एकूण १५,०५,०३७ विद्यार्थ्यांनी नोंदणी केलेली होती. त्यामध्ये ८,१०,३४८ मुलं, ६,९४,६५२ मुली आणि ३७ ट्रान्सजेंडर आहेत. एकूण १०५५० कनिष्ठ महाविद्यालयांमधून या विद्यार्थ्यांची नोंदणी झालेली होती. तर या परीक्षेसाठी संपूर्ण राज्यात विद्याथ्यांसाठी ३३७३ मुख्य केंद्रांवर परीक्षा आयोजित करण्यात आली होती.

विभागनिहाय निकाल २०२५

कोकण -९६.७४

कोल्हापूर ९३.६४

मुंबई – ९२.९३

संभाजीनगर – ९२.२४

अमरावती – ९१.४३

पुणे -९१.३२

नाशिक -९१.३१

नागपूर – ९०.५२

लातूर – ८९.४६

निकाल कुठे पाहाल –

१. https://results.digilocker.gov.in

२. https://mahahsscboard.in

३. http://hscresult.mkcl.org

४. https://results.targetpublications.org

५. https://results.navneet.com

 

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे