ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

अहिल्यानगरमध्ये उद्या या मंदिरामध्ये भाविकांसाठी राहणार दीड हजार किलो आंब्यांचा रसाचा महाप्रसाद

अहिल्यानगर

आगडगाव काळभैरवनाथ देवस्थानात येत्या रविवारी (ता. ३०) एक खास मेजवानी भाविकांना अनुभवायला मिळणार आहे. या दिवशी होणाऱ्या अन्नदानात दीड हजार किलो आंब्यांचा रस भाविकांना मिळणार आहे.

या उपक्रमासाठी आधीच आंब्यांची खरेदी झाली असून, भाविकांच्या इच्छेनुसार हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलाय.देवस्थान ट्रस्टच्या वतीने दरवर्षी मे महिन्याच्या शेवटी महाप्रसादात आमरसाची मेजवानी दिली जाते. पण यंदा भाविकांनी गुप्तदान दिल्यामुळे गुढीपाडव्याच्या निमित्तानेही हा उपक्रम ठेवण्यात आलाय.

त्यासाठी दीड हजार किलो आंबे खरेदी केले आहेत. हे आंबे नैसर्गिक पद्धतीने पिकवले जात आहेत आणि रविवारपर्यंत ते पूर्ण पिकतील. रविवारी पहाटे आरती झाल्यावर नाश्ता दिला जाईल, तर दुपारी बारा वाजता महाआरतीनंतर आमरसाचा प्रसाद सुरू होईल. सायंकाळी सात वाजता कीर्तनाचा कार्यक्रम होईल आणि त्यानंतर नगरच्या सोपानराव वडेवाले यांच्यामार्फत खास महाप्रसादाची व्यवस्था असेल.

या सगळ्या कार्यक्रमांना ऑस्ट्रेलियातून आलेले भाविक राकेशकुमारही उपस्थित राहणार आहेत. दर रविवारी देवस्थानात सकाळचा नाश्ता, दुपारचा महाप्रसाद आणि सायंकाळी कीर्तनानंतर पुन्हा महाप्रसाद असं सगळं चालतं.

या दिवशी साधारण दहा हजार भाविक प्रसादाचा लाभ घेतात. रविवारचा माहोल तर अगदी यात्रेसारखा असतो. भाविकांनी या संधीचा फायदा घ्यावा, असं आवाहन देवस्थानच्या वतीने करण्यात आलंय.दरम्यान, देवस्थान परिसरात सध्या जवळपास एक कोटी रुपयांची विकासकामं सुरू आहेत. दर रविवारी होणाऱ्या कीर्तनाचा लाभही हजारो भाविक घेतात.

अहिल्यानगर शहरापासून हे ठिकाण जवळ असल्यामुळे पर्यटकही इथे भेट देतात. भाविकांच्या सोयीसाठी देवस्थानतर्फे सगळ्या सुविधा पुरवल्या जातात. रविवारचा हा आमरसाचा कार्यक्रम भाविकांसाठी खास आनंदाचा ठरणार आहे. आंब्यांचा रस आणि भक्तीचा संगम यामुळे सगळ्यांचा उत्साह शिगेला पोहोचलाय.

 

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे