ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र

अहिल्यानगर पुणे बसस्थानक परिसरात एसटी कर्मचार्‍याचे अपहरण करून मारहाण..

अहिल्यानगर

अहिल्यानगर मधील पुणे बसस्थानक परिसरातून एका एसटी कर्मचार्‍याला तीन अनोळखी तरूणांनी दुचाकीवर जबरदस्तीने बसवून बुरूडगाव रोड परिसरातील मोकळ्या जागेत नेले.

तेथे त्यांना शिवीगाळ व दमदाटी करून लाथाबुक्क्यांनी तसेच लाकडी दांडक्याने मारहाण करण्यात आली. मोबाईल बळजबरीने हिसकावून घेण्यात आला. त्यानंतर मोबाईलमधील फोनपेचा पासवर्ड विचारून घेत 7 हजार 100 रूपये एका खात्यावर ऑनलाइन वर्ग केले.

ही घटना 15 ऑगस्ट रोजी सायंकाळी घडली. याप्रकरणी संग्राम गोपाळकृष्ण झेंडे (वय 33, रा. चिखली, ता. श्रीगोंदा) यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात 18 ऑगस्ट रोजी फिर्याद दिली असून त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

झेंडे हे एसटी महामंडळाच्या शिरूर (जि. पुणे) येथील आगारात लिपिक म्हणून कार्यरत आहेत. 15 ऑगस्ट रोजी कामानिमित्त गुजरातमधील सुरत येथे जाण्यासाठी ते चिखली येथून सायंकाळी सहाच्या सुमारास निघाले. सायंकाळी सातच्या सुमारास ते नगर येथील पुणे बसस्थानकावर आले होते.

त्यावेळी ते फोनवर बोलत उभे असताना सुमारे 22 ते 23 वर्षे वयाचे तीन अनोळखी तरूण दुचाकीवरून त्यांच्याजवळ आले. आम्ही तुम्हाला ट्रॅव्हल्सपर्यंत सोडतो, असे त्यांनी सांगितले. मात्र झेंडे यांनी त्यांना नकार दिला.

नकार दिल्यानंतरही या तिघांनी झेंडे यांना बळजबरीने त्यांच्या दुचाकीवर बसविले आणि बुरूडगाव रोड परिसरात नेले. तेथे त्यांच्याकडील मोबाईल बळजबरीने हिसकावून घेण्यात आला. त्यानंतर मारहाण व दमदाटी करून मोबाईलचा पासवर्ड विचारून घेण्यात आला.

फोनपेच्या माध्यमातून 7 हजार 100 रूपये श्री गणेश मोबाईल अ‍ॅण्ड अ‍ॅक्सेसरीजच्या खात्यावर वर्ग करण्यात आल्याचे फिर्यादीत नमूद आहे. पैसे वर्ग केल्यानंतर आरोपींनी झेंडे यांना शिवीगाळ करत मारहाण केली. जीवे मारून टाकण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे