ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

सहा डिसेंबरला शासकीय सुटी.. महापरिनिर्वाण दिनानिमित्त सुटी जाहीर

मुंबई

राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागानं परिपत्रक प्रसिद्ध केलं आहे. या परिपत्रकात भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त शुक्रवारी, ६ डिसेंबर रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

ही सुट्टी केवळ मुंबई आणि मुंबई उपनगर जिल्ह्यातील सर्व शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांसाठीच लागू असणार आहे.

काय आहे परिपत्रक? 

मुंबई आणि मुंबई उपनगरातील शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांना प्रतिवर्षी अनंत चतुर्दशी तर सन २००७ पासून गोपाळकाला अर्थात दहीहंडी निमित्त स्थानिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. पण आता २०२४ मध्ये आणखी एक म्हणजेच तिसरी स्थानिक सुट्टी ६ डिसेंबर रोजी मुंबई आणि मुंबई उपनगरासाठी जाहीर करण्यात आली आहे.

का साजरा करतात महापरिनिर्वाण दिन? 

महापरिनिर्वाण दिन हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा स्मृतिदिन असून तो ६ डिसेंबर रोजी आयोजित केला जातो.आंबेडकरांचे ६ डिसेंबर १९५६ रोजी दिल्ली येथे महापरिनिर्वाण (निधन) झाले होते, याच्या दुसऱ्या दिवशी ७ डिसेंबर रोजी मुंबईतील चैत्यभूमी येथे त्यांच्यावर बौद्ध पद्धतीने अंतिमसंस्कार करण्यात आले. निधनापूर्वी त्यांनी १४ ऑक्टोबर १९५६ रोजी लक्षावधी अनुयायांसह बौद्ध धर्म स्वीकारला होता, त्यांना बौद्ध लोक ‘बोधिसत्त्व’ मानतात. आंबेडकर हे बौद्ध गुरू होते, यामुळे त्यांच्या पुण्यतिथीसाठी ‘महापरिनिर्वाण’ हा बौद्ध संकल्पनेतील शब्द वापरण्यात आला आहे. महापरिनिर्वाण दिनानिमित्त १ डिसेंबर पासून मुंबईतील त्यांचे समाधीस्थळ असलेल्या चैत्यभूमी येथे भारतभरातून लक्षावधी लोक येतात.

दरम्यान डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १४ एप्रिल रोजीच्या जयंती दिनी संपूर्ण देशभरात सार्वजनिक सुट्टी असते. परंतू महापरिनिर्वाण दिनी सार्वजनिक सुट्टी नसते. यंदा केवळ मुंबईतील शासकीय कार्यालयांसाठी शासनानं सुट्टी जाहीर केली आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे