ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र

अहमदनगरमध्ये चेष्टा मस्करी जीवावर बेतली, मित्राकडून मित्राचा अनावधानाने खून

अहमदनगर - मेडिकल दुकानात सुरू असलेल्या मस्करीचा आणि भांडणाचा cctv व्हिडीओ आता समोर आला असून भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात याबाबत खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मित्रा-मित्रांमध्ये टिंगल टवाळी, चेष्टा मस्करी होतच असते. अनेकदा या चेष्टामस्करीतून वादही होतात. मात्र, चेष्टा मस्करीतून झालेला वाद मित्राच्या जीवावर बेतल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अहमदनगर शहरातील मुकुंदनगर परिसरात दोन युवकांमध्ये झालेल्या चेष्टामस्करीत एका 20 वर्षीय युवकाचा खून (Crime News) झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

मुकुंदनगर परिसरात एका मेडिकलमध्ये दोन युवक एकमेकांची चेष्टा करत उभे असतांनाच शमसुद्दीन खान या आरोपीला चेष्टा सहन न झाल्याने त्याने जीशान खान या आपल्याच मित्रावर कात्रीने हल्ला चढवला.

शुक्रवारी रात्री घडलेल्या या घटनेनंतर जखमी जिशान खान याला शहरातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र,आज सकाळी उपचारा दरम्यान जिशान खान या युवकाचा मृत्यू झाला आहे.

दोन मित्रांमधील एकमेकांची मस्करी जीवावर बेतल्याने या गोष्टीचा गांभीर्याने विचार करणेही तिककेच गरजेचे आहे. अनेकदा समोरच्या व्यक्तीची सहन करण्याची क्षमता पाहून आणि त्याच्या संवेदनांना ठेस पोहोचेल अशी करु नये. महाविद्यालयातही रॅगिंगच्या अशाच घटना घडत असतात. त्यातून, अनेकदा नैराश्याच्या भावनेतून विद्यार्थी टोकाचं पाऊल उचलतात, अशाही घटना यापूर्वी घडलेल्या आहेत. आता, मेडिकल दुकानात सुरू असलेल्या मस्करीतून एकाचा जीव गेल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

या दोघांमधील भांडणाचा cctv व्हिडीओ आता समोर आला असून भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात याबाबत खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर, हल्ला करणारा आरोपी शमसुद्दीन खान हा पसार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहे.

दरम्यान, या घटनेची शहरात जोरदार चर्चा असून चेष्टा-मस्करीलाही मर्यादा असायला हव्यात, असाच सूर नागरिकांचा उमटत आहे.

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे