ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

नगर मनमाड रस्त्यावरील अनधिकृत होर्डिंग्ज गुन्हा दाखल

अहमदनगर

अहमदनगर-गेल्या काही दिवसांत केवळ नऊ होर्डिंग्जवर कारवाई करण्यात आली आहे. सर्वेक्षणात आढळलेल्या 83 अनधिकृत होर्डिंग्जबाबत तात्काळ पडताळणी करून 25 जूनपर्यंत ते काढून घ्यावेत. सर्व अनधिकृत होर्डिंग्जवर तत्काळ गुन्हे दाखल करावेत, असे आदेश प्रशासक डॉ. पंकज जावळे यांनी दिले आहेत.

अतिरिक्त आयुक्त सौरभ जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात अनधिकृत होर्डिंग्जवर कारवाई सुरू आहे. प्रशासक जावळे यांनी या कारवाईचा आढावा घेतला. शहरात 384 अधिकृत होर्डिंग्ज असून या सर्वांचे स्ट्रक्चरल ऑडिट दोन दिवसांत पूर्ण करा.

अनधिकृत आढळलेल्या 83 होर्डिंग्जपैकी ज्यांच्या परवान्याचे अर्ज प्रलंबित आहेत, ते 14 जूनपर्यंत निकाली काढावेत. ज्याची परवानगी देता येणार नाही, ते अर्ज नामंजूर करा. त्यानंतर उर्वरित अनधिकृत होर्डिंग्जवर गुन्हे दाखल करावेत.सध्या सुरू असलेली कारवाई अत्यंत संथगतीने सुरू आहे. त्याला गती द्यावी.

कोणत्याही परिस्थितीत 25 जूनअखेर सर्व अनधिकृत होर्डिंग्ज काढून घ्यावेत, असे आदेश प्रशासक जावळे यांनी दिले आहेत. होर्डिंग्ज परवाना नुतनीकरणाचे तसेच नवीन होर्डिंग्जसाठीचे अर्ज प्रलंबित ठेवणे, अनधिकृत होर्डिंग्ज हटवण्याच्या कारवाईवेळी नुतनीकरण व परवानगीसाठी आलेल्या अर्जाची माहिती उपलब्ध करून न देणे, अनधिकृत होर्डिंग्ज लावणार्‍या जाहिरात एजन्सी विरूध्द कायदेशीर कारवाई न केल्याने प्रशासक जावळे यांनी जाहिरात विभाग प्रमुख सुबोध देशमुख यांना कारवाईची नोटीस बजावली आहे.

दरम्यान, शहरातील अनधिकृत मोबाईल टॉवरचे सर्वेक्षण महापालिकेकडून सुरू करण्यात आले आहे. सर्वेक्षणात उभ्या असलेल्या टॉवर संदर्भात नगररचना विभागाकडून माहिती मागविण्यात आली आहे. तसेच शहरातील अनधिकृत व मुदत संपलेल्या गॅन्ट्री काढण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. याबाबतही लवकरच कारवाई सुरू होईल, असे अतिरिक्त आयुक्त जोशी यांनी सांगितले.

तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

नगर-मनमाड रस्त्यावरील एका अनधिकृत होर्डिंग्ज प्रकरणी महापालिकेने तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. जाहिरात विभागाचे सुबोध विनायक देशमुख यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्तीविरूध्द हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 7 जून रोजी रात्री महापालिकेने हे होर्डिंग्ज कारवाई करून हटवले होते. या प्रकरणी काल गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे