AR न्यूज लेडीज स्पेशल प्लॅटफॉम तर्फे मकर संक्रांती निमित्त आयोजित शाॅपिंग फेस्टिव्हलमध्ये तनिष्क ज्वेलर्स कडून सरप्राइज लकी ड्रॉ कुपन विजेते
अहमदनगर

AR न्यूज लेडीज स्पेशल प्लॅटफॉर्म तर्फे आयोजित मकरसंक्रांती निमित्त शाॅपिंग फेस्टिव्हलचे शानदार उद्घाटन संपन्न झाले. शनिवार व रविवार सकाळपासून ते रात्री ९ वाजेपर्यंत गर्दी होती.
शनिवारी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सर्व ४५ स्टॉलधारक यांना सर्टिफिकेट आणि ट्राॅफी देण्यात आली. तसेच रविवार संध्याकाळी प्रसिद्ध सिने अभिनेते प्रशांत नेटके पाटील यांच्या उपस्थितीत AR न्यूज तर्फे लकी ड्रॉ कुपन काढून ३ विजेते जाहीर केले.
विजेते नाव – १) विद्या खाटोडे २) रूतुजा देशमुख ३) कामिनी भास्कर अशा ३ जणी विजेत्या होत्या.
तसेच तनिष्क ज्वेलर्स कडून एक सरप्राइज लकी ड्रॉ कुपन देऊन १ विजेते जाहीर करण्यात आले होते.
विजेत्या जोडीचे नाव – कोमल राहुल म्हसके या जोडीला तनिष्क ज्वेलर्स कडून चांदीचे नाणे गिफ्ट मिळाले.
हे चांदीचे नाणे गिफ्ट देताना तनिष्क ज्वेलर्स चे मॅनेजर किरण सोनवणे व तनिष्क ज्वेलर्स ची टीम उपस्थित होती.
तनिष्क ज्वेलर्स चे मॅनेजर किरण सर म्हणाले की AR न्यूज चॅनल च्या श्रुती मॅडम नी आम्हाला संधी दिली त्या बद्दल त्यांचे धन्यवाद.
या सोबतच AR न्यूज कडून तनिष्क ज्वेलर्स च्या टीम चा सत्कार करण्यात आला. यावेळी AR न्यूज चॅनल च्या मुख्य संपादिका सौ श्रुती बत्तीन – बोज्जा, मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह रोहित गांधी सर उपस्थित होते.