ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र

नाशिक मधील ७ वर्षीय चिमुकलीवर शाळेत अत्याचार, नराधम शिक्षकाने केलं हैवानी कृत्य

नाशिकच्या मालेगावमधील ३ वर्षीय चिमुकलीवर अत्याचार करण्यात आले, त्यानंतर त्या मुलीची हत्या देखील करण्यात आली. ही घटना ताजी असतानाच नांदेडमधून शिक्षकीपेशाला काळिमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. एका हैवान शिक्षकाने तब्बल ७ वर्षाच्या विद्यार्थिनीवर बलात्कार केला आहे. धक्कदायक म्हणजे ही मुलगी ज्या शाळेत शिकत होती त्याच शाळेत आरोपी शिक्षक म्हणून काम करत होता. या घटनेनंतर पोलिसांनी नराधम शिक्षकाला बेड्या ठोकल्या आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, सदर घटना ही नांदेड शहरात घडली असून काल म्हणजेच २० नोव्हेंबर रोजी पीडित अल्पवयीन मुलगी शाळेत जाण्यास कुटुंबियांना नकार देत होती. रोज आवडीने शाळेत जाणारी मुलगी आज शाळेत जायला नकार देत असल्याने तिच्या आईने तिला सतत विचारणा केली. तरीही मुलगी गप्प बसल्याने आईने प्रेमाने तिला जवळ घेऊन विचारल्यानंतर शिक्षकाने केलेला प्रकार तिने सांगितला.

घडलेला प्रकार ऐकून पीडित मुलीची आई संतापली. तिने तातडीने पोलीस स्टेशन गाठले. त्या हैवान शिक्षकाविरोधात भाग्यनगर पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून आरोपी शिक्षक विशाल लोखंडे याच्यावर 64(2), 65(2) ,351(2)  468 पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान आरोपी शिक्षकास अटक करण्यात आली असून हा खटला फास्टट्रॅक कोर्टात चालवण्याची विनंती न्यायालयाला करणार असल्याची प्रतिक्रिया उपविभागीय पोलीस अधिकारी रामेश्वर वैजंने यांनी दिली आहे. शिवाय या घटनेचा तपास सुरु असून विद्येचं मंदिर असलेल्या शाळेतसुद्धा मुली सुरक्षित नाहीत ही धक्कादायक बाब समोर आली आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे