ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

अहिल्यानगर शहर व जिल्ह्यात पुढचे दोन दिवस थंडीचा यलो अलर्ट..

अहिल्यानगर

अहिल्यानगर शहराचा विचार केला तर 27 नोव्हेंबर रोजी अहिल्या नगर शहराचे किमान तापमान 12 अंश सेल्सिअस इतके नोंदविण्यात आले व गेल्या आठवड्यात 11.6°c इतके तापमान नोंदवण्यात आले होते.

उत्तरेकडून वाहणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे थंडीचा कडाका वाढला असून अहिल्यानगर शहर व परिसरात गेल्या 27 दिवसांमध्ये तापमानाचा पारा तब्बल दहा अंशांनी घसरला आहे.

सध्या संपूर्ण राज्यामध्ये थंडी जाणवायला लागली असून सगळीकडे हुडहुडी भरवणाऱ्या थंडीच्या प्रमाणात वाढ झाल्याने वाडी वस्ती तसेच शहरी भागात देखील आता शेकोट्या पेटू लागल्या आहेत.

या दृष्टिकोनातून जर आपण अहिल्यानगर शहराचा विचार केला तर 27 नोव्हेंबर रोजी अहिल्या नगर शहराचे किमान तापमान 12 अंश सेल्सिअस इतके नोंदविण्यात आले व गेल्या आठवड्यात 11.6°c इतके तापमान नोंदवण्यात आले होते. उत्तरेकडून वाहणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे थंडीचा कडाका वाढला असून अहिल्यानगर शहर व परिसरात गेल्या 27 दिवसांमध्ये तापमानाचा पारा तब्बल दहा अंशांनी घसरला आहे.

अहिल्यानगर शहर व जिल्ह्यात पुढचे दोन दिवस थंडीचा यलो अलर्ट

याबाबत सविस्तर वृत्त असे की,अहिल्या नगर शहर व जिल्ह्यामध्ये थंडीच्या प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून येत असून गेल्या दोन दिवसांपूर्वी दहा अंश सेल्सिअस तापमान नोंदविण्यात आलेले होते. या पार्श्वभूमीवर भारतीय हवामान विभागाने शहरासह जिल्ह्यात पुढचे दोन दिवस थंडीचा येलो अलर्ट जारी केला असून आणखी सहा अंशाने तापमानात घट होईल अशी शक्यता वर्तवण्यात आलेली आहे.

जर आपण नोव्हेंबर महिन्याची सुरुवात पहिली तर पहिल्या आठवड्यात अहिल्यानगर शहराचे किमान तापमान 20° c तर कमाल 33 अंश सेल्सिअस इतके नोंदविण्यात आलेले होते. त्यानंतर तापमानाचा पारा 17 अंश सेल्सिअस होता व मागच्या वर्षीच्या तुलनेत जर बघितले तर डिसेंबर महिन्यात 17 अंश सेल्सिअस इतके किमान तापमान शहराचे होते.

परंतु यावर्षी नोव्हेंबरच्या तिसऱ्या आठवड्यातच शहराचे किमान तापमान 11 अंशापर्यंत घसरले आहे. साधारणपणे तापमानातील ही घसरण ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यापासून सुरुवात झाली होती व नऊ नोव्हेंबरला किमान तापमान 19.5 तर कमाल 31 अंश सेल्सिअस इतके होते.

१९ नोव्हेंबरचा विचार केला तर या दिवशी अहिल्यानगर शहर व परिसरात सर्वात कमी किमान तापमान 11.7 इतके नोंदवण्यात आले व 20 नोव्हेंबरला मात्र यात थोडीशी वाढ होऊन ते 15 अंश सेल्सिअस इतके नोंदवण्यात आले होते.त्यानंतर मात्र किमान व कमाल तापमानामध्ये थोड्याफार अंशाने चढ-उतार दिसून येत आहे.

बुधवारी मात्र पारा बारा अंशांवर होता व पारा घसरल्याने गारठा प्रचंड प्रमाणात वाढला आहे. थंडी सोबतच बुधवारी दिवसभर कडक उन्हाबरोबर उत्तरेकडून वाहणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे गारठा प्रचंड वाढला होता. दरम्यान भारतीय हवामान विभागाने 28 व 29 नोव्हेंबरला शहर व जिल्ह्यात थंडीचा येलो अलर्ट जारी केला असून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे